Plastic Collection Project : पेडणे पालिका क्षेत्रात ''प्लास्टिकपासून इंधन'' संकलनासाठी १०० जागा.

सध्या प्लास्टिकचा कचरा तुकडे करून कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांत उच्च दाबाने जाळण्यासाठी पाठवण्यात येतो.
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Plastic Collection पेडणे पालिका क्षेत्रात प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करणारा प्रकल्प ३० ऑक्टोबरपूर्वी सुरू करण्यात येणार आहे. तशी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सध्या प्लास्टिकचा कचरा तुकडे करून कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांत उच्च दाबाने जाळण्यासाठी पाठवण्यात येतो.

देशातील हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प असेल. यापूर्वी प्लास्टिकपासून रस्ते निर्मितीचे प्रयोग झाले आहेत

 Vishwajeet Rane
Vishwajit Rane - CSR अंतर्गत अंगणवाडीसाठी निधी मिळवण्यासाठी 'फाउंडेशन' स्थापन करणार | Gomantak TV

राणे यांनी सांगितले, की हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करा असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्लास्टिक आणि अन्य प्रक्रिया न करता येण्याजोग्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी राज्यात शंभर ठिकाणी सोय केली जाणार आहे.

या प्रकल्पात दररोज १० टन प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पावर ८ कोटी रुपये आजवर खर्च करण्यात आले आहेत.

गोवा राज्य नगर विकास यंत्रणेने (जीसुडा) नोव्हेंबर २०१४ मध्ये खासगी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर काही दिवस चाचणी स्वरूपात तो चालवण्यात आला होता.

त्यानंतर तो प्रकल्प बंद पडला आहे. राणे यांनी सांगितले, की प्रकल्प सुरू झाल्यानंतर वर्षभर प्रकल्पाच्या कामकाजावर सरकारची नजर असेल. तो यशस्वी झाला तर राज्यात अन्य ठिकाणी असे प्रकल्प उभारण्याचा विचार सरकार करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com