Goa: वेळ्ळीतील 100 लोकांचा भाजपमध्‍ये प्रवेश

Goa: वेळ्ळी मतदारसंघातील सुमारे 100 जणांनी आज भाजपमध्‍ये प्रवेश केला.
BJP Goa
BJP GoaDainik Gomantak

वेळ्ळी (Velim) मतदारसंघातील सुमारे 100 जणांनी आज भाजपमध्‍ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे वेळ्‍ळीतील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार व राज्य प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स उपस्‍थित होते. मडगाव येथील भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात आज झालेल्या या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस दामोदर नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक यांचीही उपस्‍थिती होती.

BJP Goa
Goa BJP : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप दोन्ही जागा जिंकणार

हा ‘सालसेत मिशन’चा प्रकार नसून येथील लोकांना भाजपची (BJP) खरी ओळख पटलेली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही सावियो रॉड्रिग्स यांनी मतदारसंघात अनेक योजनांचा लाभ लोकांना मिळवून दिला, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com