गोव्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलं लवकरच होणार 100 टक्के लसवंत

जेष्ठांचे लसीकरण 100 टक्के पुर्ण
Covid 19 Vaccination
Covid 19 VaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे पहिले लसीकरण 100% पूर्ण झाले असून, आता दुसरे लसीकरण 100 टक्के पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील पहिल्या तीन राज्यांमध्ये गोवा स्थान मिळवू शकतो. जेष्ठांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून, राज्यातील आरोग्य सेवांनी बुधवारपासून सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवरील कोविडविरोधी (COVID-19) लसीकरण कार्यक्रम आता राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाशी विलिन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. (100% double vaccination coverage of those in 18+ age group in goa)

Covid 19 Vaccination
जानेवारी 2022 पर्यंत मोपा विमानतळाचे 60 टक्के काम पूर्ण

राज्यात मंगळवारपर्यंत एकूण दुसऱ्या डोसचे कव्हरेज हे 99.93% इतके होते.

राज्यात एका वर्षाहून अधिक काळ लसीकरण (Covid 19 Vaccination) मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य सेवेने दिलेल्या माहिती नुसार, आतापर्यंत किमान 11.7 लाख लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. बोरकर म्हणाले की 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे अँटी-कोविड लसीकरणमध्ये देखील लक्षणीय अकडेवारी प्राप्त झाली आहे. राज्यात समोर आलेल्या आकडेवारी नुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 87% पहिले लसीकरण तर 64% दुसरे लसीकरण देण्यात आले आहे.

आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लसीकरण केले जाते, तेव्हा आरोग्य सेवांना त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे आणि स्वतंत्र जागेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मंगळवारी, 239 लोकांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण झाले असून यातील किमान 217 लोकांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्वीचा डोस चुकवलेले किंवा 18 वर्षे पूर्ण वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com