राज्यातील सर्व पालिकांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर : विश्वजीत राणे

जन्म-मृत्यू नोंदणी दाखले देण्यासंबंधी होणार कार्यवाही
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : नगरविकास खात्यातर्फे सध्या पाचशे मिटरपर्यंतच्या बांधकामांसाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व पालिकांतील शंभर कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. पालिका प्रशासन पारदर्शक करताना लोकांची कामे शिल्लक उरणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याशिवाय पालिका क्षेत्रातील जन्म मृत्यू नोंदणी ऑनलाईन करताना घरबसल्या दाखले देण्यासंबंधीची कार्यवाहीही सुरू करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane
‘त्या’ सात अंगणवाडी शिक्षिकांचे पणजीत धरणे

फोंडा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची आज नगरविकासमंत्री राणे व फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना नाईक डांगी तसेच इतर सर्व नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी योगीराज गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी फोंड्याच्या विकासासाठी मास्टरप्लॅनची आवश्‍यकता स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केल्याने गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या बैठकीत मास्टर प्लॅनची योजना मंजूर करण्यात आली असल्याचे सांगताना पणजी शहरानंतर जर कोणत्या शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल, तर ते फोंड्याला असे विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केले.

जुनी पालिका इमारत जपणार

फोंड्यातील पालिकेची जुन्या इमारतीला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे ही इमारत जपून ठेवताना नवीन विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. जुने बसस्थानक ते ढवळी बगल मार्गापर्यंतचा रस्ता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून सर्वांनी संघटित प्रयत्न आणि सहकार्य केले तर ही विकासकामे अल्पावधीत पूर्ण होतील. फोंड्याची नवीन पालिका इमारत तसेच शास्त्री इमारत, गोल्डन ज्युबिली प्रॉजेक्ट इमारत आदी प्रकल्पही वेळेत पूर्ण करण्यात येतील. शिवाय शहरातील सर्व विकासकामे जलदगतीने होतील, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com