पिसुर्ले सत्तरी येथील पिसुर्ले आय.डी.सी. जवळच असलेल्या रस्त्यावर दहा चाकी एल.पी. ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली. तत्काळ वाळपई अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. ट्रकच्या केबीनला आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी सकाळी पिसुर्ले आय.डी.सी. जवळच असलेल्या रस्त्यावरुन दहा चाकी एल.पी. ट्रक जात होता. यावेळी पिसुर्ले येथे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन ट्रकला अपघात झाला. या अपघातात केबीनला आग लागल्याची घटना घडली. (क्रमांक एन.एल.०२ क्यू. ९९३१) हा अपघातग्रस्त ट्रकचा क्रमांक आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
याबाबत पणजी मुख्य अग्निशमन कार्यालयात कंट्रोलरुम मध्ये लोकांनी याची माहीती दिली व नंतर वाळपई अग्निशमन दलाला कळविण्यात आले. सकाळी ७.२५ वाजताच्या घटनेची माहीती मिळताच वाळपई अग्निशमनचे लिडींग फायर फायटर अरविंद देसाई, चालक महादेव गावडे, फायर फायटर उमेश गावकर, कालिदास गावस, आनंद शेटकर आदी जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होत अथक परिश्रमातून दीड तास मदतकार्य केले व आग विझविली. या घटनेत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून पंधरा लाखांची मालमत्ता वाचविली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.