Theft Case: दहा लाखांचे चोरीचे दागिने विकून गोव्यात अय्याशी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बस्तर जिल्ह्यातील नगरनार भागात नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
10 lakh worth stolen jewellery sold theft spent on goa trip with friends held
10 lakh worth stolen jewellery sold theft spent on goa trip with friends held
Published on
Updated on

Theft Case: बस्तर जिल्ह्यातील नगरनार भागात नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या बदमाश मामा-भाच्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. निर्जन घराची रेकी करुन ते चोरी करायचे. तसेच, चोरीच्या पैशातून हे चोरटे गोव्यात मौजमजा करायचे. मात्र अखेर पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश आले. आरोपींच्या ताब्यातून चोरीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरनार येथील रहिवासी सुरेंद्र कुमार दिवांगन हे घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते. काही दिवसांनी ते घरी परतले असता कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी नगरनार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दंतेवाडा जिल्ह्यातील गिदाम येथील कृष्णा शेट्टी या तरुणाने ही चोरी केली आहे. यानंतर पोलिसांनी कृष्णाला पकडले. चौकशीत त्याने आपला मामा संदीप सेठिया याच्यासोबत हा गुन्हा केल्याचेही पोलिसांना सांगितले.

10 lakh worth stolen jewellery sold theft spent on goa trip with friends held
Goa Crime Case: बहिणीच्या घरी सडतो म्हणून गोव्यात घेऊन गेले; नातेवाईकांनीच आठवडाभर केला सामूहिक अत्याचार

या प्रकरणाची माहिती देताना बस्तरचे एसपी सलभ सिन्हा म्हणाले की, नगरनार पोलीस स्टेशन परिसरात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर एक टीम तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये नगरनार पोलीस ठाण्याच्या सायबर सेलची मदत घेण्यात आली.

पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले असता, संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन गिदाम जिल्हा दंतेवाडा येथील असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिस पथकाने संशयित कृष्णा सेट्टी वय वर्ष 28 रा. गीदाम शिव मंदिर, प्रभाग क्रमांक 12, जिल्हा दंतेवाडा याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने सांगितले की, 28 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी मामा राहुल सेट्टी याच्याबरोबर मोटारसायकलवरुन नगरनार येथे एका निर्जन घराची रेकी करण्यासाठी गेला होता.

दरम्यान, रेकी करुन घरात घुसून कपाटात ठेवलेल्या कानातले दागिने, मंगळसूत्राचे लॉकेट, एक जोड टॉप्स, एक जोडी चेन, एक जोड कानातले, गळ्यात दोन तोळे, छोटी चेन असा ऐवज असल्याचे आरोपीने सांगितले. लॉकेट आणि चांदीचे दागिने, तीन जोडे पायतले, कमरपट्टा, बांगड्या आणि 50 हजारांची रोकड चोरुन पलायन केले.

चोरीचे पैसे आपापसात वाटून राहुल सेट्टी आणि कृष्णा यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये वाटून घेतले. आरोपींनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने जगदलपूर महानगरपालिकेचे प्रभाग पर्यवेक्षक संदीप सेठिया यांना विकले. विक्रीच्या पैशातून राहुलने फोन-पे ॲपद्वारे कृष्णा सेट्टी याला 80 हजार रुपये पाठवले होते.

10 lakh worth stolen jewellery sold theft spent on goa trip with friends held
Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

यानंतर 30 मार्च 2024 रोजी आरोपी कृष्णा सेट्टी, राहुल सेट्टी आणि अन्य एका आरोपीसह मोटारसायकलवरुन माडपाल गावात पोहोचले. त्यांनी अर्जदार सुरेंद्रकुमार दिवांगण यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने, एक राणीचा हार, एक लहान हार, एक जोड कानातले, एक जोड झुमके, चार अंगठ्या, चांदीचे पायातले आणि 50 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

तिन्ही आरोपींनी 50 हजारांची रोकड आपापसात वाटून घेतली. चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आरोपी संदीप सेठियाला विकले. त्याच्याकडून मिळालेले एक लाख 40 हजार रुपये आपआपसांत वाटून घेण्यात आले. आरोपी कृष्णा सेट्टी याने चोरीच्या पैशातून मित्रांसोबत गोव्यात मौजमजा केल्याचे सांगितले.

10 lakh worth stolen jewellery sold theft spent on goa trip with friends held
Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून दोन हजार रुपये आणि कस्तुरी गावात चोरीला गेलेले कानातले जोडे जप्त केले. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 457, 380 अंतर्गत चौकशी करण्यात आली. याशिवाय, आरोपी संदीप सेठिया याच्या ताब्यातून 72.97 ग्रॅम वजनाचे 3 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

आरोपी संदीप सेठियाविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कृष्णा सेट्टी आणि संदीप सेठिया यांच्या ताब्यातून एकूण 14 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने जप्त केले आहेत, ज्यांचे अंदाजे बाजार मूल्य 10 लाखांपेक्षा जास्त आहे. चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com