Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

Liquor Seized USgao: उसगाव येथे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट दारू उत्पादन व वितरण रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पहिल्या छाप्यात चार जणांना अटक करण्यात आली होती.
Jail Arrest
Jail ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उसगाव येथे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट दारू उत्पादन व वितरण रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पहिल्या छाप्यात चार जणांना अटक करण्यात आली होती. तसेच १.५ कोटी रुपयांचा बनावट दारू साठा जप्त केला होता.

याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी आता पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धवशिरे, तिस्क, उसगाव येथील ‘तेजा ऑटो सर्विस स्टेशन’च्या मागील

Jail Arrest
Polem Checkpost Liquor Smuggling: पिझ्झा डिलिव्हरी, बनावट सरकारी वाहनातून मद्यतस्करी! पोळे चेकनाक्यावर गैरप्रकार; कारवाईची मागणी

गोदामावर छापा टाकला होता. येथे मोठ्या प्रमाणावर बनावट दारू तयार करून साठवली जात असल्याचे उघड झाले होते. राजस्थान व गुजरातमधील चार जणांना यावेळी ताब्यात घेण्यात आले होते.

Jail Arrest
Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

दरम्यान, याप्रकरण आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या कारवाईत गोविंदसिंह राजपूत (२४), मुकेश आदिवासी (५०) महेंद्रसिंह राजपूत (२४), प्रकाश मीना (२८) आणि दुसऱ्या कारवाईत करणसिंग राजपूत (४२), मुनाफ शेख (४२), सावंतवाडी, भरत राठोड (२५) यांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com