WTC 2025-27 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडिया कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार?

WTC 2025-27 Schedule: दक्षिण आफ्रिकेने 2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकल्याच्या एका दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) WTC 2025-27 चे शेड्यूल जाहीर केले. यामध्ये 9 संघांमध्ये एकूण 71 सामने खेळले जातील.
shubman gill
shubman gill Dainik Gomantak
Published on
Updated on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 दक्षिण आफ्रिकेने जिंकल्याच्या एक दिवसानंतर लगेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) WTC 2025-27 चे शेड्यूल जाहीर केले. यामध्ये 9 संघांमध्ये एकूण 71 सामने खेळले जातील. 17 जूनपासून याची सुरुवात होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॅले येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. शेड्यूलनुसार, ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 22 सामने खेळणार असून इंग्लंड 21 सामने खेळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस अ‍ॅशेस मालिकेदरम्यान दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. तर टीम इंडिया 20 जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना लीड्समध्ये खेळला जाईल.

टीम इंडिया 18 कसोटी सामने खेळणार

दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया WTC 2025-27 शेड्यूलनुसार एकूण 18 कसोटी सामने खेळणार आहे. 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्याची सुरुवात होणार आहे. यानंतर, टीम इंडिया वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळेल. पुढे कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर टीम इंडिया जाणार आहे.

shubman gill
Team India Test squad: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'हे' खेळाडू इंग्रजांना देणार टक्कर; कर्णधार कोण?

टीम इंडियाचे सामने

इंग्लंड: 5 सामने

वेस्ट इंडिज: 2 सामने

दक्षिण आफ्रिका: 2 सामने

ऑस्ट्रेलिया: 5 सामने

श्रीलंका: 2 सामने

न्यूझीलंड: 2 सामने

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बदला घेण्याची संधी

टीम इंडियाला (Team india) 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु यावेळी मात्र टीम इंडियाचे बहुतेक सामने घरच्या मैदानावर असून टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत ते जिंकायचे आहेत. या सामन्यांदरम्यान टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाचे असणार आहे. यंदाच्या शेड्यूलनुसार ऑस्ट्रेलियाला भारताचा दौरा करायचा आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून मागील पराभवाचा बदला घ्यावा लागेल.

shubman gill
Australia vs South Africa: ॲनाबेल सदरलँडने रचला इतिहास; महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ठोकले 'द्विशतक'

गतविजेता ऑक्टोबरमध्ये पहिला कसोटी सामना खेळेल

गतविजेता दक्षिण आफ्रिका (South Africa) ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाईल. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे चाहते सप्टेंबर 2026 मध्ये त्यांची घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

shubman gill
South Africa Swami Narayan Temple: दक्षिण आफ्रिकेत बांधलं जातंय सर्वात मोठं मंदिर, PM मोदींसमोर होणार 3D प्रेझेंटेशन

माजी विजेता सर्वाधिक सामने खेळणार

2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत केवळ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा जास्त म्हणजे प्रत्येकी 5-5 सामने खेळतील. स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त 22 कसोटी सामने खेळेल, तर इंग्लंड 21 कसोटी सामने खेळेल. याशिवाय न्यूझीलंड 16, वेस्ट इंडिज 14, दक्षिण आफ्रिका 14, पाकिस्तान 13, श्रीलंका 12 आणि बांगलादेश 12 कसोटी सामने खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com