
पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा डाव ११३ धावांत गुंडाळल्याचे समाधान पुदुचेरीला जास्त काळ लाभले नाही; कारण पहिल्या दिवसअखेर मंगळवारी त्यांचीही ७ बाद ४५ अशी घसरगुंडी उडाली.
गुजरातमधील सुरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर सुरू असलेल्या या तीन दिवसीय लढतीच्या पहिल्या दिवशी तब्बल १७ विकेट पडल्या. गोव्याचा (Goa) संघ अजून ६८ धावांनी पुढे असून बुधवारी प्रतिस्पर्ध्यांच्या बाकी तीन विकेट झटपट गुंडाळल्यास त्यांना पहिल्या डावात आघाडी शक्य होईल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिद साब (४१) याचा अपवाद वगळता गोव्याच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र, नंतर गोव्याच्या गोलंदाजांनी प्रतिहल्ला चढवत पुदुचेरीला कोंडीत पकडले.
संक्षिप्त धावफलक गोवा, पहिला डाव ५७ षटकांत सर्वबाद ११३ (सर्वांभ नाईक ३, साईराज गोवेकर १९, बरहान दाश ५, आफ्रिद साब ४१, विनीत कामत १, साई नाईक १३, शमिक कामत १३, मोहित यादव ५, कार्तिक वडार २, शिवम सिंग नाबाद ०, संचित नाईक ०, पंकज भाटी ३-३२, सुरेंद्र बिष्णोई ४-३५, आर. जिवितेशन ३-२). पुदुचेरी, पहिला डाव ३१ षटकांत ७ बाद ४५ (शैलेश वैथियानाथन नाबाद १४, आहिल कचरू १८, शमिक कामत १०-८-५-१, शिवम सिंग ६-१-२०-२, मोहित यादव ८-४-१२-२, संचित नाईक ७-४-४-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.