

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीत २०२२ मध्ये उद्योजक कायतान फर्नांडिस यांनी ८३ मते मिळवून अध्यक्षपदी येण्याचा पराक्रम साधला होता, चार वर्षांनंतर त्यांना कडवे आव्हान देत वालंका आलेमाव यांनीही ८३ मते मिळवून संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा इतिहास रचला.
पुढील चार वर्षे राज्यातील फुटबॉलची प्रशासकीय धुरा महिलेच्या हाती असेल. चार वर्षांपूर्वी कायतानकडून झालेल्या भावाच्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला. ताळगाव येथे मंगळवारी संध्याकाळी ‘जीएफए’ची निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट निवडणूक झाली. वालंका यांच्यावर १६० पैकी बहुसंख्य क्लब प्रतिनिधींनी विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांना १६ मतांच्या फरकाने विजय मिळविता आला. मावळते अध्यक्ष कायतान यांना ६७ मते मिळाली, तर १० मते अवैध ठरली.
वालंका यांच्यासाठी ‘प्रथमायोग’
२०२२ मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या महिला
जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) महिला फुटबॉल समितीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला
१९५९ मध्ये गोवा फुटबॉल संघटनेची स्थापना, २०२६ मध्ये प्रथमच महिला अध्यक्ष
हा गोमंतकीय फुटबॉलचा विजय आहे. चर्चिल आलेमाव यांनी गोमंतकीय फुटबॉलसाठी जे काही केले आहे, त्यावर विश्वास दाखविणाऱ्या क्लबचा हा विजय आहे. हा विजय पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी आहे. हा विजय गोमंतकीय लोकांचा असून राज्यातील फुटबॉल पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आहे. तीन दिवसांत सर्वांनी मेहनत घेतली, त्यामुळेच हा विजय साध्य झाला.
- वालंका आलेमाव, नवनिर्वाचित अध्यक्ष, गोवा फुटबॉल असोसिएशन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.