Temba Bavuma Record: टेम्बा बावुमाने रचला इतिहास! टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला 'हा' जागतिक रेकॉर्ड; बेन स्टोक्स आणि लिंडसे हॅसेटला सोडले मागे

Temba Bavuma World Record: दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली 400 हून अधिक धावांनी जिंकला. बावुमा याच्यासाठी हा विजय खूप ठरला.
Temba Bavuma World Record
Temba Bavuma Dainik Gomantak
Published on
Updated on

Temba Bavuma World Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. मालिकेतील दुसराही सामना दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली 400 हून अधिक धावांनी जिंकला. बावुमा याच्यासाठी हा विजय खूप ठरला. या विजयासह त्याने जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केला, जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नव्हता.

अपराजित कर्णधार बावुमा

टेम्बा बावुमा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला असा कर्णधार ठरला, ज्याने आपल्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतील पहिल्या 12 कसोटी सामन्यांपैकी 11 कसोटी सामने जिंकले, तर केवळ एक सामना अनिर्णित राहिला. यापूर्वी, हा रेकॉर्ड इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा लिंडसे हॅसेट यांच्या नावावर होता. या दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या पहिल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्त्व करताना 10 सामने जिंकले. परंतु, बावुमाने 11 विजय मिळवून हा रेकॉर्ड मोडला.

Temba Bavuma World Record
Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

बावुमाच्या पुनरागमनाने संघाला यश

काही दिवसांपूर्वी जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, तेव्हा दुखापतीमुळे बावुमा खेळू शकला नव्हता. त्यावेळी एडन मार्करमने त्याच्या जागी कर्णधारपद सांभाळत होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, बावुमाने कर्णधार म्हणून पुनरागमन करताच पुन्हा एकदा संघ विजयाच्या रथावर स्वार झाला. यापूर्वी, बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. अनेक वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसीचा कोणताही किताब जिंकला. सध्याही दक्षिण आफ्रिका WTC फायनल खेळण्याच्या शर्यतीत भक्कमपणे उभा आहे.

Temba Bavuma World Record
VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेसाठी नेहमीच कठीण राहिले, परंतु यावेळी बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाचा मायदेशात सूपडा साफ केला. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने 2000 मध्ये टीम इंडियाला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभूत केले होते. म्हणजेच, टेम्बा बावुमाने तब्बल 25 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जागा केला. आता बावुमाचा हा विजयरथ आणखी किती दिवस असाच कायम राहतो, हे पाहणे क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com