"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Shane Watson In Goa: या स्पर्धेच्या निमित्ताने वॉटसन सध्या गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आहे. गोव्यातील वास्तव्याबद्दल बोलताना तो अत्यंत आनंदी दिसला.
Shane Watson In Goa
Shane Watson In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Shane Watson In Goa: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरताना येणाऱ्या आव्हानांवर आणि 'लेजेंड्स लीग'मधील अनुभवांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी 'वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी-20 लीग'सारख्या स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची आणि खेळाशी जोडून राहण्याची एक मोठी संधी असल्याचे त्याने म्हटले आहे.

वॉटसनच्या मते, निवृत्तीनंतर शरीराला खेळासाठी तयार ठेवणे ही एक मोठी तारेवरची कसरत असते. तुम्ही वर्षानुवर्षे सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळलेले असता, तरीही एका विशिष्ट वयानंतर शरीरावर जास्त ताण देणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी घेणे हाच या वयातील फिटनेसचा खरा मंत्र असल्याचे त्याने नमूद केले.

जेव्हा एखादा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होतो, तेव्हा त्याचे शरीर त्या कठोर व्यायामाची सवय सोडून देते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्याच वेगाने मैदानात उतरणे हे सर्वात मोठे आव्हान असते. 'लेजेंड्स लीग'मध्ये खेळाडू नवीन प्रयोग करतात का, असे विचारले असता वॉटसनने स्पष्ट केले की, बहुतेक खेळाडू त्यांच्या जुन्या आणि अनुभवी कौशल्यांवरच विश्वास ठेवतात. त्याने स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, "माझ्यासाठी ही काही नवीन 'स्विच हिट' किंवा 'रिव्हर्स स्वीप' मारण्याची वेळ नाही. मी जे आयुष्यभर शिकलो आणि जे मला उत्तम जमते, त्यावरच मी लक्ष केंद्रित करणार आहे." तरीही, सराव करणाऱ्या जुन्या खेळाडूंकडून काही नवीन क्लृप्त्या पाहायला मिळतीलच, अशी मिश्किल टिप्पणीही त्याने केली.

Shane Watson In Goa
Sara Tendulkar In Goa: सचिनची लेक सारा गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, बीच लूक चर्चेत; पाहा व्हिडिओ

या स्पर्धेच्या निमित्ताने वॉटसन सध्या गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आहे. गोव्यातील (Goa) वास्तव्याबद्दल बोलताना तो अत्यंत आनंदी दिसला. समुद्राच्या लाटांच्या आवाजाने सकाळी जाग येणे हा अनुभव अतिशय खास असल्याचे त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियातही समुद्रकिनारी राहण्याची संस्कृती असली तरी गोव्यातील सकाळ काही वेगळीच आणि प्रसन्न होती, असे तो म्हणाला. खेळासोबतच गोवन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. खेळाव्यतिरिक्त जुन्या मित्रांना आणि मैदानातील एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा भेटणे, हा या संपूर्ण दौऱ्यातील सर्वात सुखद भाग असल्याचे त्याने मान्य केले. निवृत्तीनंतर केवळ कोचिंग किंवा कॉमेंट्री हेच पर्याय न राहता, पुन्हा एकदा बॅट-बॉल हातात धरुन जुन्या आठवणींना उजाळा देण्याची ही संधी वॉटसनसाठी खूप मोलाची ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com