Santosh Trophy 2025: गोव्याने संधी गमावली! संतोष करंडक फुटबॉलमध्ये मुख्य फेरी हुकली; लक्षद्वीपसोबत गोलबरोबरी

Goa Lakshadweep: स्पर्धेच्या ह गटातील निकालांनंतर गोव्याचा संघ आसाममध्ये मुख्य फेरीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक गटातून एकच संघ पात्र ठरणार आहे.
Santosh Trophy 2025
Santosh Trophy 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष फुटबॉल संघाला सलग दुसऱ्या वर्षी संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची मुख्य फेरी गाठण्यास अपयश आले. सोमवारी त्यांना ‘ह’ गटातील सामन्यात लक्षद्वीपने १-१ असे गोलबरोबरी रोखल्यानंतर सेनादलाने सलग दुसरा विजय नोंदविताना कर्नाटकला ३-० असे पराभूत केले.

स्पर्धेच्या ह गटातील निकालांनंतर गोव्याचा संघ आसाममध्ये मुख्य फेरीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक गटातून एकच संघ पात्र ठरणार आहे. बंगळूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या या गटात प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर सेनादलाचे सर्वाधिक सहा, कर्नाटकचे तीन गुण झाले असून गोवा व लक्षद्वीप यांच्या खाती प्रत्येकी एक गुण आहे.

Santosh Trophy 2025
Goa Football Association: फुटबॉल परिषदेत अनेक विषयांवर चर्चा! आमदार कामत म्हणाले की सर्वच शिफारसी...

अगोदरच्या लढतीत सेनादलाने गोव्याला ४-० असे, तर कर्नाटकने लक्षद्वीपला ३-० असे पराभूत केले होते. अखेरच्या साखळी लढतीत गोव्याचा संघ कर्नाटकविरुद्ध खेळेल, तर सेनादलाचा सामना लक्षद्वीपविरुद्ध होईल. मुख्य फेरीस पात्र ठरण्यासाठी सेनादलास बरोबरी पुरेशी ठरेल. संतोष करंडक यापूर्वी पाच वेळा जिंकलेल्या गोव्याला आव्हान कायम राखण्यासाठी सोमवारी विजय नोंदविणे आवश्यक होते.

Santosh Trophy 2025
Goa Football : गोव्यात 'फुटबॉलची' स्थिती चिंताजनक! क्रीडामंत्री गावडेंनी व्यक्त केली नाराजी; स्थिती सुधारण्यासाठी शिखर परिषदेचे आयोजन

सेल्विन मिरांडा याने ४५+१ व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गोव्याने आघाडी घेतली, पण ६५व्या मिनिटास सबीर अली बाबू याने केलेल्या गोलमुळे लक्षद्वीपने बरोबरी साधली. यावेळी बचावफळीतील चूक गोव्याला भोवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com