Ranji Trophy 2024 Goa Match: गोव्याच्या क्रिकेटपटूंनी इतिहास घडवला,90 वर्षात पहिल्यांदाच फलंदाजांची 606 धावांची भागीदारी

Goa Ranji Cricket Team: कश्यप बखले (३०० नाबाद) आणि स्नेहल कंवठणकर (३१४ नाबाद) धावांचे योगदान दिले.
Ranji Trophy 2024, Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy 2024 Goa Vs Arunachal Pradesh Batting Partnership

पर्वरी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या दोन फलंदाजांनी नव्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. कश्यप बखले आणि स्नेहल कंवठणकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजी करताना तब्बल ६०६ धावांची भागीदारी केली.

रणजीच्या नव्वद वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. अरुणाचल प्रदेश विरोधातील सामन्यात बखले आणि कंवठकर यांनी नाबाद तीनशे धावांची खेळी केली.

कश्यप बखले (३०० नाबाद) आणि स्नेहल कंवठणकर (३१४ नाबाद) धावांचे योगदान दिले. गोव्याचा पहिला डाव दोन बाद 727 धावांवर घोषित करण्यात आला. त्यापूर्वी अरुणाचल प्रदेशने पहिल्या डावात सर्वबाद ८४ धावा केल्या होत्या.

कश्यप बखले आणि स्नेहल कंवठणकर यांची ६०६ धावांची भागीदारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरी उच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगाकारा आणि महेला जयवर्धेने यांनी ६२४ धावांची भागीदारी केली होती. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात हा सामना झाला होता.

दरम्यान, रणजी करंडक स्पर्धेत बखले आणि कंवठणकर यांची ६०६ धावांची भागीदारी उच्चांकी ठरली असून, यापूर्वी स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांनी महाराष्ट्रासाठी खेळताना ५९४ धावांची भागीदारी केली होती. २०२६-१७ मध्ये दिल्ली विरोधात हा सामना झाला होता.

Ranji Trophy 2024, Goa Cricket Team
Ranji Trophy: अरुणाचल विरुद्ध गोव्याच्या स्नेहालची धुवांधार बॅटिंग; सगुणनंतर त्रिशतक झळकावणारा एकमेव फलंदाज

बखले आणि कंवठणकर यांच्या अप्रतिम खेळीची नोंद क्रिकेट विश्वातून घेतली जात असून, रेकॉर्डवर दोघांची नावे सुवर्णअक्षरांनी नोंदवली गेली आहेत. तसेच, रणजी स्पर्धेत दोन तीन शतके पटकावल्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे.

यापूर्वी १९८९ -९० साली डब्ल्युव्ही रमण आणि एजी क्रिपाल सिंग यांनी तामिळनाडूसाठी खेळताना त्रिशतकी खेळी केली होती. गोव्या विरोधात हा सामना झाला होता.

सामन्याच्या सुरुवातीला अर्जुन तेंडुलकरने गोव्यासाठी पाच बळी घेत अरुणाचल प्रदेशची गोची केली होती. अर्जुनने ९ षटकात २५ धावा करताना पाच बळी घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com