Rajmata Jijabai Trophy : गोव्याच्या महिलांची दणदणीत कामगिरी! हिमाचलविरुद्ध ‘सप्ततारांकित’ विजयाची नोंद

Goa vs Himachal Pradesh Football Match: गोव्याच्या हिमाचल प्रदेशवरील विजयात पर्ल फर्नांडिस हिची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पर्ल हिने अनुक्रमे तिसऱ्या, २७व्या आणि ६०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.
Goa Womens Football Team
Goa Womens Football TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Rajmata Jijabai Trophy Goa Vs Himachal Womens Football Match

पणजी: गोव्याच्या महिला फुटबॉल संघाने सोमवारी राजमाता जिजाबाई करंडक सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत हिमाचल प्रदेशवर ७-० गोलफरकाने ‘सप्ततारांकित’ विजयाची नोंद केली.

स्पर्धेतील ‘अ’ गट सामना केरळमधील पलक्कड येथे झाला. गोव्याने सलग दुसरा सामना जिंकला. अगोदरच्या लढतीत त्यांनी तमिळनाडूला एका गोलने हरविले होते. अखेरचा साखळी सामना केरळविरुद्ध होईल. सोमवारी झालेल्या अन्य एका लढतीत तमिळनाडूने केरळला ३-१ फरकाने हरविले. गटात आता गोव्याचे सर्वाधिक सहा गुण आहेत. केरळ व तमिळनाडूचे प्रत्येकी तीन गुण असून हिमाचल प्रदेशला दोन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले आहे.

Goa Sports

Goa Womens Football Team
Goa Football : गोव्यात 'फुटबॉलची' स्थिती चिंताजनक! क्रीडामंत्री गावडेंनी व्यक्त केली नाराजी; स्थिती सुधारण्यासाठी शिखर परिषदेचे आयोजन

गोव्याच्या हिमाचल प्रदेशवरील विजयात पर्ल फर्नांडिस हिची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पर्ल हिने अनुक्रमे तिसऱ्या, २७व्या आणि ६०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. पूर्वार्धातील तिचे दोन गोल, याशिवाय ॲनिएला बार्रेटो हिने दहाव्या मिनिटास, पुष्पा परब हिने अकराव्या मिनिटास, तर सुश्मिता जाधव हिने ३३ व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केल्यामुळे विश्रांतीला गोव्यापाशी पाच गोलची भक्कम आघाडी होती. साठाव्या मिनिटात पर्ल हिने हॅटट्रिक पूर्ण केल्यानंतर गोव्यासाठी सातवा गोल स्वेलेन फर्नांडिस हिने ७० व्या मिनिटास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com