FC Goa: एफसी गोवाच्या ताफ्यात १८ वर्षीय आघाडीपटू

Alan Saji: ॲलन साजी मूळ केरळमधील असून वयाच्या १२ व्या वर्षापासून तो आरएफवायसी अकादमीत आहे
Alan Saji: ॲलन साजी मूळ केरळमधील असून वयाच्या १२ व्या वर्षापासून तो आरएफवायसी अकादमीत आहे
Dainik Gomantak
Published on
Updated on

एफसी गोवा संघात १८ वर्षीय आघाडीपटू ॲलन साजी बहुवर्षीय करारावर दाखल झाला. तो रिलायन्स फाऊंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) अकादमीचा प्रशिक्षणार्थी आहे. ॲलन साजी मूळ केरळमधील असून वयाच्या १२ व्या वर्षापासून तो आरएफवायसी अकादमीत आहे.

या वर्षी जपानमध्ये झालेल्या सॅनिक्स कप युवा फुटबॉल स्पर्धेत ॲलनने आरएफवायसी अकादमीचे प्रतिनिधित्व केले होते. शानदार कामगिरीमुळे त्याला सॅनिक्स कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात स्थान मिळाले होते. ॲलनने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (आरएफडीएल) स्पर्धेत केरळा ब्लास्टर्स व धेंपो स्पोर्टस क्लबविरुद्ध गोलची नोंद केली होती.

एफसी गोवा संघात दाखल होणे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. अनुभवी खेळाडूंसमवेत सराव व खेळण्यासाठी मी प्रेरित आहे. शिकणे आणि विकास साधण्यासाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे, असे ॲलन याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

Alan Saji: ॲलन साजी मूळ केरळमधील असून वयाच्या १२ व्या वर्षापासून तो आरएफवायसी अकादमीत आहे
Manolo Marquez: FC Goa चे मार्गदर्शक मानोलो आता भारतीय संघाचे हेड कोच; दुहेरी जबाबदारी

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनाही युवा आघाडीपटूने प्रभावित केले आहे. ॲलन साजी हा अपवादात्मक गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्य असलेल्या फुटबॉलपटू आहे. तो वेगवान, धाडसी आणि गोलक्षेत्रातील अतिशय हुशार खेळाडू आहे. त्याची हवेतील चेंडूवरही हुकमत आहे. त्याने झपाट्याने प्रगती साधली असून त्याला कौशल्य वाढविण्यासाठी योग्य व्यासपीठ देऊ,` असे मार्केझ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com