Bandodkar Ground: बांदोडकर मैदानाला येणार नवा साज! नूतनीकरणास प्रारंभ; वॉकिंग ट्रॅक होणार चकाचक

Bhausaheb Bandodkar Ground Bandoda: गर्दीचा आवाका वाढत असल्यामुळे गेल्या वर्षी वॉकिंगसाठी आणखी एक दगडी ट्रॅक तयार करण्यात आला होता.
Bhausaheb Bandodkar Ground Bandoda
Bhausaheb Bandodkar Ground BandodaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: काशीमठ-बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदान हे फोंडा तालुक्यातील एक महत्त्वाचे मैदान. खास करून वॉकिंगसाठी येणाऱ्या लोकांकरिता हे मैदान म्हणजे पर्वणीच.

कुर्टी येथे क्रीडा खात्याचे सुसज्ज मैदान असूनही फोंड्यातील लोकांची पहिली पसंती बांदोडकर मैदानाला असल्याची प्रचिती तिथे वॉकिंगकरिता नेहमी होणारी गर्दी देते.

गर्दीचा आवाका वाढत असल्यामुळे गेल्या वर्षी वॉकिंगसाठी आणखी एक दगडी ट्रॅक तयार करण्यात आला होता. त्याचाही लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. शिवाय विश्रांती घेण्यासाठी बसण्याची व्यवस्थाही केली आहे.

पण २४ मे २०१५ रोजी अस्तित्वात आलेल्या या मैदानाच्या मुख्य सिंथेटिक ट्रॅकला आता पॅच पडल्यामुळे नूतनीकरणाची आवश्यकता आहे. हे राज्यातील एकमेव असे मैदान आहे, जे क्रीडा खात्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहे. हे मैदान जेव्हा अस्तित्वात आले, तेव्हा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. या मैदानाचे प्रणेते तेच असल्यामुळे बांदोडा पंचायतीने ठराव घेऊन हे मैदान ‘साबांखा’ला देण्याचा निर्णय घेतला.

Bhausaheb Bandodkar Ground Bandoda
National Games: राष्ट्रीय स्पर्धेत पाचवेळा ‘पोडियम’ मिळविणारा गोमंतकीय! 'बाबू' ठऱतोय हुकमाचा एक्का

१० मार्चला खुला होणार ‘ट्रॅक’

या मैदानाचे व्यवस्थापन, डागडुजी ‘साबांखा’तर्फे केली जात आहे. त्याप्रमाणे सोमवारपासून सुरू होणारे मुख्य ट्रॅकचे नूतनीकरणाचे काम महिनाभर चालणार असून दहा मार्चला हा नूतनीकरण झालेला ट्रॅक लोकांना उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत दगडी ट्रॅकचा वापर वॉकिंगसाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bhausaheb Bandodkar Ground Bandoda
Goa Sports: 'कारणे देऊ नका, कार्यक्षमता वाढवा'! क्रीडा संघटनांच्या कारभारावर गावडेंची नाराजी

ज्येष्ठ नागरिकांना वरदान

ढवळी येथील सुदाम गावकर म्हणाले की, वॉकिंग करणाऱ्यांसाठी हे एक आदर्श मैदान आहे. मी या मैदानावर नियमितपणे वॉकिंगसाठी येतो. येथे भ्रमंती करताना वेगळीच अनुभूती प्राप्त होते. ज्येष्ठ नागरिकांना तर हे मैदान म्हणजे वरदानच. आता मुख्य वॉकिंग ट्रॅकचे नूतनीकरण होणार असल्यामुळे दुधात साखर पडणार, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com