Swapnil Asnodkar: गोव्यानं डावललं, पण IPL गाजवणाऱ्या स्वप्नीलला 'या' राज्यानं हेरलं! बनवलं सीनियर क्रिकेट संघाचा कोच

Nagaland Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनने यंदा स्वप्नीलला प्रशिक्षकपदी पुन्हा संधी दिली नाही, मात्र त्याच्या प्रदीर्घ अनुभवाला नागालँड क्रिकेट असोसिएशनने प्राधान्य दिले.
Swapnil Asnodkar: IPL गाजवणारा गोव्याचा स्वप्नील बनला 'या' राज्याच्या सीनियर क्रिकेट संघाचा कोच!
Swapnil AsnodkarDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा दिग्गज क्रिकेटपटू, सफल फलंदाज स्वप्नील अस्नोडकर याची नागालँड क्रिकेट असोसिएशनने आगामी २०२४-२५ देशांतर्गत क्रिकेट मोसमासाठी रणजी, तसेच सीनियर संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. दिमापूर येथे स्वप्नीलने पदाची सूत्रे स्वीकारली.

नागालँडचा रणजी क्रिकेट संघ यंदा प्लेट विभागात खेळत असून याच गटात गोव्याचाही समावेश आहे. याशिवाय नागालँडचा सीनियर संघ विजय हजारे करंडक एकदिवसीय, तसेच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतही खेळणार आहे. भारताचे माजी कसोटीपटू देबाशिष मोहंती नागालँड रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

गोवा क्रिकेट असोसिएशनने यंदा स्वप्नीलला प्रशिक्षकपदी पुन्हा संधी दिली नाही, मात्र त्याच्या प्रदीर्घ अनुभवाला नागालँड क्रिकेट असोसिएशनने प्राधान्य दिले. ४० वर्षीय स्वप्नील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) लेव्हल २ प्रशिक्षक असून त्याने लेव्हल ३ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. गतमोसमात स्वप्नीलची एनसीएने राजकोट येथील १९ वर्षांखालील विभागीय शिबिरासाठी, तसेच एकदिवसीय स्पर्धेसाठी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.

Swapnil Asnodkar: IPL गाजवणारा गोव्याचा स्वप्नील बनला 'या' राज्याच्या सीनियर क्रिकेट संघाचा कोच!
Goa Cricket: गोव्याच्या मुलींची तमिळनाडूत विजयी झेप! अंतिम लढतीत यजमान संघास सहा विकेटने हरवले

२००१-०२ मध्ये रणजी पदार्पण केल्यानंतर स्वप्नीलने गोव्याचे २०१७-१८ पर्यंत प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने त्याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली. २०१९-२०, २०२२-२३ व २०२३-२४ मोसमात तो गोव्याच्या २५/२३ वर्षांखालील संघाचा मुख्य प्रशिक्षक होता, तसेच २०२१-२२ मोसमात त्याच्या १९ वर्षांखालील संघाचीही जबाबदारी होती.

आयपीएल स्पर्धा गाजवलेला क्रिकेटपटू

शेन वॉर्न याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघातून खेळताना स्वप्नील अस्नोडकरने २००८ मधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा गाजविली. टी-२० क्रिकेटमधील बिनधास्त स्फोटक फलंदाजीने स्वप्नील, तसेच पर्यायाने गोमंतकीय क्रिकेटही प्रकाशझोतात आले. त्यावर्षी त्याने आयपीएल स्पर्धेत १३३.४७ च्या स्ट्राईक रेटने ३११ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने सप्टेंबर २००८ मध्ये भारत अ संघाचेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते. एकदरीत स्वप्नील रणजी करंडक व दुलीप करंडक स्पर्धेत मिळून ८८ सामने खेळला, त्यात १४ शतके व २५ अर्धशतकांच्या साह्याने ५८८३ धावा केल्या. लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेटमध्ये त्याने ८५ सामन्यांत सहा शतके व १९ अर्धशतकांसह २८५८ धावा केल्या, यामध्ये २००७ मधील देवधर करंडक स्पर्धेत दक्षिण विभागातर्फे नोंदविलेल्या शतकाचाही समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७३ सामन्यांत १३ अर्धशतकांसह १६९९ धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com