Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

ICC Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही याचा अंतिम निर्णय बीसीसीआय लवकरच घेणार आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah Champions Trophy 2025

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी आली आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता जसप्रीत बुमराह खेळू शकणार की नाही? याबाबतची मोठी अपडेट आता समोर आली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो दिलेल्या वृत्तानुसार, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? याचा अंतिम निर्णय बीसीसीआय ११ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी घेईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आयसीसीनं संघात बदल करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही शेवटची तारीख निश्चित केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानावर उतरलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बुमराह खेळेल असं म्हटलं जात होतं. मात्र, बीसीसीआयने दुखापतीमुळे बुमराहला संघात त्याला स्थान दिलं नाही.

Jasprit Bumrah
Champions Trophy 2025: "पाकिस्तान भारताचा पराभव करणार..." शोएब अख्तरच्या भविष्यवाणीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणं खूप महत्वाचं आहे. बुमराहकडे कोणत्याही सामन्याचा निकाल एकट्याने बदलण्याची ताकद आहे. अहवालानुसार, बुमराहने अलिकडेच सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठीचं स्कॅन केले.

बीसीसीआयची वैद्यकीय टीम आता निवडकर्त्यांशी आणि संघ व्यवस्थापनाशी बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल चर्चा करेल, त्यानंतर बुमराहबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या भारतीय संघात बुमराहला स्थान देण्यात आलं आहे.

Jasprit Bumrah
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून 'हा' स्टार खेळाडू बाहेर; संघाला मोठा झटका

जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त नसेल, तर सर्वात मोठा प्रश्न असा असेल की त्याच्या जागी संघात कोण खेळणार? जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर हर्षित राणाला संघात समाविष्ट केले जाऊ शकते असे मानले जाते.

हर्षितने नुकतेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. हर्षितने आतापर्यंत २ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. पदार्पणाच्या सामन्यातच हर्षितनं कहर केला आणि तीन विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com