गोव्यात उद्यापासून रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार! स्टार टेनिसपटू लिअँडर पेसनं तरुणांना केलं मोलाचं मार्गदर्शन

Star Tennis Player Leander Paes: 2036 मधील ऑलिंपिकमध्ये भारताला पदकांचे अर्धशतक गाठायचे असल्यास वातानुकूलीत खोलीत बसून चर्चा करण्याऐवजी मैदानात कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे.
गोव्यात उद्यापासून रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार! स्टार टेनिसपटू लिअँडर पेसनं तरुणांना केलं मोलाचं मार्गदर्शन
Leander Paes:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वडिलांनी जिंकलेली पदके स्वच्छ करुन ठेवताना लहानपणीच क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करण्याची प्रेरणा मिळाली. पूर्वी साधनसुविधांसाठी तारेवरची कसरत करावी लागायची, पण आता परिस्थिती बदलली आहे. 2036 मधील ऑलिंपिकमध्ये भारताला पदकांचे अर्धशतक गाठायचे असल्यास वातानुकूलीत खोलीत बसून चर्चा करण्याऐवजी मैदानात कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे, असे मत जगप्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस याने शुक्रवारी व्यक्त केले.

'देशात बदल घडवायचा'

गोव्यात रविवारी (ता. 27) आयर्नमॅन स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा सदिच्छादूत या नात्याने लिअँडरने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी लिअँडर म्हणाला, की ‘‘माझ्या देशात मला बदल घडवायचा आहे. देशातील युवांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहित करण्याचे ध्येय बाळगले आहे. मी देशवासीयांसाठी, तिरंग्यासाठी खेळलो हीच माझ्या आयुष्यातील आनंदी घटना आहे.’’ शारीरिक सुदृढता, तसेच आवश्‍यक झोप, योग्य आहार, गुणवत्तापूर्ण जीवनशैली महत्वाची असल्याचे लिअँडरने नमूद केले.

गोव्यात उद्यापासून रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार! स्टार टेनिसपटू लिअँडर पेसनं तरुणांना केलं मोलाचं मार्गदर्शन
Goa Football Association: फुटबॉल परिषदेत अनेक विषयांवर चर्चा! आमदार कामत म्हणाले की सर्वच शिफारसी...

भारताचा एकमेव ऑलिंपिक पदकप्राप्त टेनिसपटू

लिअँडर पेस हा ऑलिंपिकमधील भारताचा टेनिसमधील एकमेव पदकविजेता खेळाडू आहे. त्याने 1996 साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये टेनिस पुरुष एकेरीत ब्राँझपदक जिंकले होते. त्याने सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धांत मिळून पुरुष दुहेरीत आठ, तर मिश्र दुहेरीत दहा विजेतीपदे पटकावली आहेत.

जागतिक टेनिसमधील सर्वोत्तम दुहेरी टेनिसपटूंत गणल्या जाणाऱ्या 51 वर्षीय लिअँडर याच्या नावावर डेव्हिस कपमध्ये सर्वाधिक दुहेरी सामने जिंकण्याचा विक्रम आहे. तो 2021 मध्ये स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त झाला. लिअँडरचे वडील डॉ. वेस पेस हे सुद्धा ऑलिंपिक पदकविजेते आहे. 1972 मधील म्युनिक ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ब्राँझपदक जिंकले, तेव्हा वेस या संघाचे सदस्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com