International Master Ethan Vaz: अपराजित एथननं गोव्याचं नाव केलं रोशन; राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत जिंकलं 'सिल्वर'

National Sub Junior Open Chess Championship: गोव्यातील बुद्धिबळाच्या इतिहासात एक अभूतपूर्व कामगिरी करत इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझने राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याला रौप्यपदक मिळवून दिले.
International Master Ethan Vaz: अपराजित एथननं गोव्याचं नाव केलं रोशन; राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत जिंकलं 'सिल्वर'
International Master Ethan VazDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील बुद्धिबळाच्या इतिहासात एक अभूतपूर्व कामगिरी करत इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझने राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याला रौप्यपदक मिळवून दिले. आपल्या शानदार खेळीच्या जोरावर एथनने स्पर्धेत पुन्हा एकदा छाप सोडली.

एथनची उत्कृष्ट खेळी

दरम्यान, एथनने उत्कृष्ट खेळ करत 11 फेऱ्यांमध्ये 9.5 गुण मिळवले, 8 विजय आणि 3 बरोबरी साधून 2024 च्या 49 व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर (अंडर-15) ओपन बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा तामिळनाडू बुद्धिबळ संघटनेच्या वतीने ऑल इंडिया बुद्धिबळ महासंघाच्या अंतर्गत 3 ते 11 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमधील होसूर येथे आयोजित करण्यात आली होती.

International Master Ethan Vaz: अपराजित एथननं गोव्याचं नाव केलं रोशन; राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत जिंकलं 'सिल्वर'
National Sub-Junior Kabaddi Tournament: गोव्याच्या पोरी लय लढल्या; राष्ट्रीय सबज्युनियर कबड्डी स्पर्धेत मिळवले 'ब्राँझ'

अपराजित एथन

13 वर्षीय एथनने संपूर्ण 11 फेऱ्यांच्या या स्पर्धेत एकही पराभव न स्वीकारता 9 दिवस चाललेल्या या 288 खेळाडूंच्या स्पर्धेत अपराजित राहण्याचा मान मिळवला, ज्यात भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सहभागी होते आणि त्यांनी त्यांच्या राज्यांचे प्रतिनिधित्व केले. या कामगिरीमुळे, एथनची 2025 मधील आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा आणि फिडे विश्व युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com