I-League 2025: इंटर काशी संघाचा सनसनाटी विजय, पेनल्टी शूटआऊटवर बंगळूर एफसीचा पराभव

Inter Kashi vs Bengaluru FC: पेनल्टी शूटआऊटवर माजी विजेत्या बंगळूर एफसीला पराभवाचा जबरदस्त धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
I-League 2025
I-League 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर इंटर काशी संघाला आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहावे लागले, मात्र त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संघाने बुधवारी सुपर कप फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली.

त्यांनी पेनल्टी शूटआऊटवर माजी विजेत्या बंगळूर एफसीला पराभवाचा जबरदस्त धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सामना निर्धारित वेळेत १-१ असा गोलबरोबरीत राहिला.

रायन विल्यम्स याने बंगळूरला आघाडी मिळवून दिली, सामना संपण्यास तीन मिनिटे असताना बदली खेळाडू मातिया बाबोविच याच्या गोलमुळे इंटर काशीने बरोबरी साधली. पेनल्टी शूटआऊटमध्ये आल्बर्टो नोग्युएरा याचा पेनल्टी फटका अडविणारा गोलरक्षक शुभम धस इंटर काशीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

I-League 2025
Goa Weather: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू, वातावरणातील बदलामुळे गोमंतकीय हैराण

मुंबई सिटीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठताना चेन्नईयीन एफसीचा ४-० फरकाने धुव्वा उडविला. लाल्लियानझुआला छांगटे याने दोन, निकोलाओस कारालिस व बिपिन सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com