ISL 2024-25: FC GOA समोर अपराजित बंगळूरचा कठीण पेपर! अनुभवी बोर्हा, रॉलिन अनुपलब्ध

FC Goa: माजी विजेते बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कामगिरीसह अग्रस्थानी आहेत. त्यांना रोखण्याचे कठीण आव्हान एफसी गोवासमोर असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान संघाचा कस लागेल.
FC Goa: माजी विजेते बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कामगिरीसह अग्रस्थानी आहेत. त्यांना रोखण्याचे कठीण आव्हान एफसी गोवासमोर असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान संघाचा कस लागेल.
FC Goa, Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League 2024-25 FC Goa VS Bangalore FC

पणजी: माजी विजेते बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कामगिरीसह अग्रस्थानी आहेत. त्यांना रोखण्याचे कठीण आव्हान एफसी गोवासमोर असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (ता. २) यजमान संघाचा कस लागेल.

गेरार्ड झारागोझा यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर एफसीचे शनिवारी पारडे जड असेल. १६ गुणांसह हा संघ अव्वल स्थानी आहे. सहापैकी पाच सामने त्यांनी जिंकले असून एक बरोबरी आहे. त्यांनी ११ गोल नोंदविताना फक्त एक गोल स्वीकारला आहे. केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या मागील विजयी लढतीपूर्वी सलग पाच सामन्यांत बंगळूरने क्लीन शीट राखली होती. याउलट मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाची स्थिती आहे.

त्यांनी सहापैकी फक्त एकच सामना जिंकला असून तीन बरोबरी व दोन पराभव पत्करले आहेत. सहा गुणांसह ते दहाव्या क्रमांकावर आहेत. ११ गोल नोंदविताना तब्बल १२ गोल स्वीकारले असून एकही क्लीन शीट राखलेली आहे. तुलनेत एफसी गोवाचा बचाव कमजोर आहे. कामगिरीतील तफावत बंगळूरला झुकते माप देत आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ यांनी बंगळूर एफसी एक उत्कृष्ट संघ असून त्यांच्याकडून राष्ट्रीय संघातील खेळाडू चांगले खेळत असल्याचे सांगितले. बंगळूरतर्फे नव्वद टक्के गोल भारतीय खेळाडू नोंदवत असून बाकी संघांची मदार परदेशी खेळाडूंवर आहे याकडेही मार्केझ यांनी लक्ष वेधले. केवळ बंगळूरविरुद्धचाच नव्हे, तर पंजाब एफसीविरुद्धचा पुढील सामनाही महत्त्वाचा असल्याचे एफसी गोवाच्या प्रशिक्षकास वाटते.

गतमोसमाच्या तुलनेत चांगला खेळ

मार्केझ यांनी एफसी गोवा संघ सामन्यातील कामगिरीत सातत्य राखण्यास कमी पडत असल्याचा पुनरुच्चार केला. त्याचवेळी आपला संघ गतमोसमाच्या तुलनेत अधिक चांगला खेळत असल्याचा दावाही त्यांनी केला. संघाचे आक्रमणही धारदार ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच एफसी गोवासाठी यावेळचा मोसम चांगला ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागील सामन्यात एफसी गोवाने चेन्नईयीनला २-२ गोलबरोबरीत रोखले होते.

FC Goa: माजी विजेते बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कामगिरीसह अग्रस्थानी आहेत. त्यांना रोखण्याचे कठीण आव्हान एफसी गोवासमोर असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान संघाचा कस लागेल.
Goa Monsoon: गोव्यात 106 टक्के अधिक पाऊस! हवामान बदलाने चिंता; थंडी लांबली

बोर्हा, रॉलिन अनुपलब्ध; संदेश उपलब्ध

चेन्नईयीनविरुद्धच्या मागील सामन्यात जायबंदी झालेले बोर्हा हेर्रेरा व रॉलिन बोर्जिस हे प्रमुख खेळाडू पुढील दोन्ही सामन्यांत खेळू शकणार नसल्याची माहिती मार्केझ यांनी दिली. मात्र दुखापतीतून सावरलेला अनुभवी बचावपटू संदेश झिंगन बंगळूरविरुद्ध खेळण्याचे संकेतही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com