ICC Women ODI Ranking: स्मृती मंधानाचा जलवा! दिग्गजांना मात देत वनडे क्रमवारीत मारली बाजी; बनली नंबर 1 खेळाडू

Smriti Mandhana Ranking: आयसीसीने महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय संघाची उपकर्णधार आणि सुपरस्टार सलामीवीर स्मृती मंधाना क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसीने महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय संघाची उपकर्णधार आणि सुपरस्टार सलामीवीर स्मृती मंधाना क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली. मात्र स्टार खेळाडू दीप्ती शर्माला क्रमवारीत दणका बसला. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेची अनुभवी खेळाडू लॉरा वोल्वार्डलाही या क्रमवारीत धक्का बसला.

स्मृती मंधानाचा जलवा!

टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली. याआगोदर ती दुसऱ्या क्रमांकावर होती. आधी पहिल्या क्रमांकावर असलेली लॉरा वोल्वार्ड आता तिसऱ्या पोहोचली. इंग्लंडची नॅट सायव्हर-ब्रंट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. पूर्वी ती तिसऱ्या क्रमांकावर होती. दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्ज क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर आहे. तर कर्णधार हरमनप्रीत कौर 16 व्या क्रमांकावर आहे. दीप्ती शर्मा आता 33 व्या क्रमांकावर आहे. तर ऋचा घोष फलंदाजीच्या क्रमवारीत 41 व्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, टॉप 10 मध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. गोलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची किम गार्थ 5 व्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाची अलाना किंग 6 व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची केट क्रॉस 7 व्या क्रमांकावर आहे. टॉप 10 गोलंदाजांच्या क्रमवारीत कोणतीही भारतीय खेळाडू नाही. रेणुका सिंग ठाकूर 24 व्या क्रमांकावर आहे. सध्या ती भारताची (India) टॉप रँकिंग गोलंदाज आहे. क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com