I League 2024: चर्चिल ब्रदर्सचा आय लीगमध्ये 13 वर्षांनी जलवा! चुरशीच्या सामन्यात धेंपो क्लबला नमवले

I League Football Trophy 2024: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील यावेळच्या ‘गोवन डर्बी’त चर्चिल ब्रदर्सने बाजी मारली. त्यांनी माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला २-० फरकाने नमवून १३ गुणांसह गुणतक्त्यात निर्विवाद अग्रस्थान प्राप्त केले.
Churchill Brothers FC
Churchill Brothers FCDainik Gomantak
Published on
Updated on

I League Football Trophy 2024 Churchill Broters vs Dempo Club

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील यावेळच्या ‘गोवन डर्बी’त चर्चिल ब्रदर्सने बाजी मारली. त्यांनी माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला २-० फरकाने नमवून १३ गुणांसह गुणतक्त्यात निर्विवाद अग्रस्थान प्राप्त केले.

सामना बुधवारी सासष्टीतील राय मैदानावर झाला. चर्चिल ब्रदर्सने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवून आय-लीग स्पर्धेत धेंपो क्लबवर तब्बल १३ वर्षांनंतर विजय नोंदविण्याची किमया साधली. स्पर्धेत यापूर्वी ४ डिसेंबर २०११ रोजी चर्चिल ब्रदर्सने धेंपो क्लबवर २-१ फरकाने अखेरचा विजय नोंदविला होता.

Churchill Brothers FC
Goa Liberation Day: घरात घुसलेल्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला खडसावून सांगणारी १५ वर्षांची मुलगी; वाचा शारदा सावईकरांचा लढा

सामन्याच्या १३व्या मिनिटास लाल्लियानसांगा रेन्थलेई याच्या डाव्या पायाच्या शानदार फटक्यावर चर्चिल ब्रदर्सने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर ७५व्या मिनिटास दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने गोल नोंदवून संघाचा विजय पक्का केला. लेके याने स्पर्धेतील वैयक्तिक पाचवा गोल अनिल गावकर याच्या असिस्टवर केला.

Churchill Brothers FC
Goa Cricket: 'जीसीए' आमसभा न्यायालयाच्या आदेशानुसार; उच्च न्यायालय वकिलांच्या निरीक्षणाखाली होणार बैठक

धेंपो क्लबचा गोलरक्षक आशिष सिबी याची कामगिरी स्पृहणीय ठरली. त्यामुळे त्यांना मोठा पराभव टाळता आला. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर लगेच गोलरक्षक व खेळाडू समोरासमोर असताना आशिष याने चर्चिल ब्रदर्सच्या अनिलचा प्रयत्न दक्षतेने फोल ठरविला. एकंदरीत सामन्यावर वार्कास्थित संघाचेच वर्चस्व राहिले. त्यांचा कोलंबियन मध्यरक्षक सेबॅस्टियन गुटिएरेझ याने वारंवार धेंपो क्लबच्या बचावफळीवर दबाव टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com