I League: करंडक एक, दावेदार संघ चार! आय-लीग जेतेपदासाठी तिन्ही लढती निर्णायक

I League Football Competition: विजेतेपदासाठी इच्छुक असलेल्या चार संघांत चर्चिल ब्रदर्सचे ३९, गोकुळम केरळाचे ३७, रियल काश्मीरचे ३६, तर इंटर काशीचे ३६ गुण आहेत.
Churchill Brothers
I League 2024-25Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत २०२४-२५ मोसमातील विजेतेपदाचा करंडक जिंकण्यासाठी जोरदार चुरस असून चार संघ दावेदार आहेत. साहजिकच रविवारी (ता. ६) होणाऱ्या तिन्ही लढती निर्णायक असतील.

श्रीनगर येथे रियल काश्मीर व चर्चिल ब्रदर्स यांच्यात, कोझिकोड येथे गोकुळम केरळा व धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात, तर पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे इंटर काशी एफसी व राजस्थान युनायटेड यांच्यात लढत होईल. सर्व सामने संध्याकाळी चार वाजता सुरू होतील. विजेतेपदासाठी इच्छुक असलेल्या चार संघांत चर्चिल ब्रदर्सचे ३९, गोकुळम केरळाचे ३७, रियल काश्मीरचे ३६, तर इंटर काशीचे ३६ गुण आहेत.

सध्याच्या समीकरणानुसार, चर्चिल ब्रदर्सला सामना जिंकावा लागेल. त्यांचे ४२ गुण होतील व त्यांना बारा वर्षांनंतर तिसऱ्यांदा आय-लीग स्पर्धा जिंकणे शक्य होईल. बरोबरी झाल्यास त्यांचे ४० गुण होतील आणि बाकी निकालांकडे लक्ष ठेवावे लागेल. इंटर काशी एफसीने राजस्थान युनायटेडला पराभूत केल्यास त्यांचे ३९ गुण होतील.

Churchill Brothers
I League: रियल काश्मीरला जोरदार धक्का, धेंपो क्लबने रोखले गोलबरोबरीत; चर्चिल ब्रदर्स, इंटर काशी लढत ठरणार निर्णायक

नामधारी एफसीविरुद्धचा त्यांचा निकाल एआयएफएफ अपिल समितीच्या हाती आहे. या समितीने सुनावणीनंतर इंटर काशीला तीन गुण बहाल केल्यास त्यांचे ४२ गुण होतील. त्याचवेळी चर्चिल ब्रदर्स पराभूत झाल्यास इंटर काशी प्रथमच स्पर्धा जिंकू शकेल. गोकुळम केरळाने धेंपो क्लबला पराभूत केल्यास त्यांचे ४० गुण होतील. त्याचवेळी चर्चिल ब्रदर्स व इंटर काशी पराभूत होणे आवश्यक आहे, तसे झाल्यास गोकुळम केरळा तिसऱ्यांदा आय-लीग करंडक पटकावू शकेल.

Churchill Brothers
I League: इंटर काशीचे स्वप्न भंगले! चर्चिल ब्रदर्सने रोखले गोलबरोबरीत; अग्रस्थानासाठी एका गुणाची गरज

शनिवारी झालेल्या लढतीनंतर ऐजॉल एफसी २०२५-२६ मध्ये सलग अकराव्यांदा आय-लीग स्पर्धेत खेळणार हे निश्चित झाले, तर स्पोर्टिंग क्लब बंगळूरच्या पदावनतीवर शिक्कामोर्तब झाले. घरच्या मैदानावर ऐजॉल एफसीने नामधारी एफसीवर ३-० असा देखणा विजय मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com