I League: चर्चिल ब्रदर्सची सलग तिसरी बरोबरी! नामधारी एफसीविरुद्धचा सामना अनिर्णित

Churchill Brothers Vs Namdhari FC: सामना पंजाबमधील श्री भैनी साहिब येथे झाला. पापे गास्सामा याने ३१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने आघाडी प्राप्त केली.
Churchill Brothers Vs Namdhari FC
I League Churchill Brothers Vs Namdhari FCDainik Gomantak
Published on
Updated on

I League Churchill Brothers Vs Namdhari FC

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान टिकवून ठेवले असले, तरी माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला सलग तिसऱ्या लढतीत बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. नामधारी एफसीने पिछाडीवरून येत त्यांना १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

सामना पंजाबमधील श्री भैनी साहिब येथे झाला. पापे गास्सामा याने ३१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने आघाडी प्राप्त केली, मात्र उत्तरार्धात ती भेदली गेली. क्लेडसन कार्व्हालो दासिल्वा याने ६८व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर यजमान संघाला बरोबरी साधून दिली.

चर्चिल ब्रदर्ससाठी उत्तरार्धात गोलरक्षक सयद कादिर याची दक्षता निर्णायक ठरली. यापूर्वी दिल्ली एफसी व ऐजॉल एफसी यांच्याविरुद्धही चर्चिल ब्रदर्सला बरोबरीचा एक गुण मिळाला होता. एकंदरीत चर्चिल ब्रदर्सची ही पाचवी बरोबरी ठरली.

Churchill Brothers Vs Namdhari FC
I League: रोनाल्डोमुळे स्पोर्टिंग गोवाची बाजी! तीन गुण केले प्राप्त; ट्राऊ एफसीवर निसटती मात

त्यांचे १६ सामन्यांतून २९ गुण झाले असून ते एका गुणाच्या फरकाने अव्वल स्थानी आहेत. नामधारी एफसीचे स्पर्धेतील पाचव्या बरोबरीसह १६ सामन्यांतून २३ गुण झाले आहेत. ते सहाव्या स्थानी घसरले. इंटर काशी एफसीच्या आक्षेपानंतर नामधारी एफसीला तीन गुणांचा फटका बसला असून तेवढेच गुण प्राप्त झालेला इंटर काशी संघ आता १५ सामन्यांतून २८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना एक मार्च रोजी राजस्थान युनायटेडविरुद्ध सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com