Domestic Cricket Season Schedule: टी-20 अन् वनडे क्रिकेटचा रंगणार थरार; गोव्याच्या महिलांची ऑक्टोबरपासून 'मोहीम'

Goa Senior Woman Cricket Team: देशांतर्गत क्रिकेटमधील आगामी 2024-25 मोसमात गोव्याच्या सीनियर महिला संघाची मोहीम ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. संघ टी-20 व एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.
टी-20 अन् वनडे क्रिकेटचा रंगणार थरार; गोव्याच्या महिलांची ऑक्टोबरपासून 'मोहीम'
goa senior womens team dainik gomantak

देशांतर्गत क्रिकेटमधील आगामी 2024-25 मोसमात गोव्याच्या सीनियर महिला संघाची मोहीम ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. संघ टी-20 व एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नियोजित वेळापत्रकानुसार, गोव्याची सीनियर महिला क्रिकेट संघ 17 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्पर्धेत खेळेल.

गोव्याचा अ गटात समावेश असून आठ संघांच्या या गटात मुंबई (Mumbai), आंध्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, जम्मू-काश्मीर, मिझोराम हे अन्य संघ आहेत. या गटातील सामने गुजरातमधील बडोदा येथे खेळले जातील.

दरम्यान, सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील गटसाखळी सामने 4 ते 16 डिसेंबर या कालावधीत होतील. गोव्याचा क गटात समावेश असून दिल्ली, तामिळनाडू (Tamil Nadu), मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, मणिपूर हे अन्य संघ आहेत. या गटातील सर्व सामने चंडीगड येथे होणार आहेत.

याशिवाय, महिला गटात 19 वर्षांखालील टी-20 स्पर्धेतील गटसाखळी सामने 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत, तर एकदिवसीय स्पर्धेतील सामने 4 ते 12 जानेवारी या कालावधीत होतील.

23 वर्षांखालील वयोगटात टी-20 गटवार स्पर्धा 5 ते 12 जानेवारी या कालावधीत, तर एकदिवसीय स्पर्धा 5 ते 13 मार्च या कालावधीत खेळले जातील. 15 वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेतील गट सामने 21 ते 29 नोव्हेंबर या दरम्यान होतील.

गतमोसमातील कामगिरी

गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने गतमोसमात एकदिवसीय स्पर्धेतील क गटात सहापैकी चार सामने जिंकले, तर दोन पराभव पत्करले. सात संघांच्या गटात त्यांना 16 गुणांसह चौथा क्रमांक मिळाला. टी-20 स्पर्धेतील ड गटात सहा सामन्यांत प्रत्येकी तीन विजय व पराभव नोंदविले. संघ 12 गुणांसह सात संघांत पाचव्या स्थानी राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com