Goa Chess: मये येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात शिरोडकरने अपराजित कामगिरीसह सहाही डाव जिंकले
Goa Chess CompetitionDainik Gomantak

Goa Chess Competition: अपराजित कामगिरीसह राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष शिरोडकर विजयी; चैतन्य गावकर उपविजेता

Goa Chess: मये येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात शिरोडकरने अपराजित कामगिरीसह सहाही डाव जिंकले
Published on

पणजी: आयुष शिरोडकर याने मये येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अखिल गोवा राज्यस्तरीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धेत त्याने अपराजित कामगिरीसह सर्व सहाही डाव जिंकले.

चैतन्य गावकर याला पाच गुणांसह उपविजेतेपद, तर सरस पोवार याला तिसरा क्रमांक मिळाला. मुलींच्या गटात गुंजल चोपडेकर आणि श्रीया पाटील या दोघींचेही समान साडेपाच गुण झाले. टायब्रेकमध्ये गुंजलने बाजी मारली आणि तिला विजेते घोषित करण्यात आले. श्रीया पाटील दुसऱ्या क्रमांकावर आणि रशेल परेरा तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

खुल्या गटात शुभ बोरकर, मयुरेश देसाई, आर्यव्रत नाईक देसाई, विहान तारी, आरव चोपडेकर, जोशुआ तेलिस आणि सिद्धीराज गावकर, तर मुलींत लिया सिल्वेरा, सईजा देसाई, सिद्धी नाईक, शिनेल रॉड्रिग्ज, वैष्णवी परब, तन्वी हाडकोणकर आणि स्कायला रॉड्रिग्स यांना बक्षीस मिळाले.

Goa Chess: मये येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात शिरोडकरने अपराजित कामगिरीसह सहाही डाव जिंकले
Goa Chess: अखिल गोवा राज्य बुद्धिबळ स्पर्धेत मंदार विजेता; शानदार अपराजित कामगिरी

वयोगट पातळीवर इव्हान तेलिस, नारायण ऊर्फ आरव प्रभुदेसाई, ऋषित गावस, शुभम धुमे, शौर्य अग्रासनी, अथर्व बोरकर, ह्रदय मोरजकर, कनिष्क सावंत, अनीश खोर्जुवेकर, चैतन्य पाटील, वियोम परब, यथार्थ देसाई, अथर्व परब, आदर्श नाईक, शुभान मलकर, शिवन्या राव, सिदोनिया डिकुन्हा, कृतिका अग्रवाल, श्रेया बांदोडकर, रोशेल परेरा, साची साळगावकर, नव्या नार्वेकर, स्वेतलाना डिकुन्हा, अदिती कामत, अवनी कामत, समृधी मलकर, पूर्वी नेस्वणकर यांना बक्षीस मिळाले. कुंभारवाडा-मये येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती. तेथील सातेरी देवस्थान सभागृहात स्पर्धा झाली.

बक्षीस वितरण सोहळ्यास मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, महेश कांदोळकर (अध्यक्ष गोवा बुद्धिबळ संघटना), दिलीप शेट, नीलेश शेटकर, अरविंद म्हामल, गणेश शेट, राजन कडकडे, सत्यवान हरमलकर यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com