Odisha Chess Tournament: गोव्याचा अमेयची ‘ओडिशा जीएम ओपन’मध्ये छाप; संयुक्त तिसरा, टायब्रेकरमध्ये सहावा क्रमांक

Odisha Grandmaster GM Open Chess Tournament Bhubaneswar: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने भुवनेश्वर येथे झालेल्या ओडिशा ग्रँडमास्टर (जीएम) ओपन बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडली.
Ameya Audi Chess Goa
Ameya Audi Chess GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Grandmaster GM Open Chess Tournament Bhubaneswar Ameya Audi Goa

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने भुवनेश्वर येथे झालेल्या ओडिशा ग्रँडमास्टर (जीएम) ओपन बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडली. त्याने स्पर्धेत पोडियम फिनिश मिळवताना संयुक्त तिसरा, तर टायब्रेकर गुणांत सहावा क्रमांक पटकावला.

भारतातील जीएम बुद्धिबळ मालिकेतील प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या भुवनेश्वरमधील स्पर्धेत २० देशांतील १८२ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते, त्यापैकी ८१ जण फिडे किताबधारक होते.

अमेयप्रमाणेच एकूण सहा खेळाडूंचे दहा फेऱ्यांतून समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुण पद्धती अवलंबल्यानंतर अमेय सहाव्या स्थानी, तसेच बक्षीस विजेत्या खेळाडूंच्या पोडियममध्ये कायम राहिला. त्याने सहा विजय नोंदविले, तीन डाव बरोबरीत राखले, तर फक्त एक डाव गमावला. त्याला स्पर्धेत तेरावे मानांकन होते.

Ameya Audi Chess Goa
Goa Mining Issues: आमची घरे-मंदिरे वाचवा! डिचोलीतील 'खाण'प्रश्नांवरून ग्रामस्थ चलबिचल; आंदोलनाचा इशारा

अमेयने (एलो २४१२) अखेरच्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर श्याम निखिल याला, तर आठव्या फेरीत स्लोव्हाकियाचा ग्रँडमास्टर मिकुलास मनिक या बलाढ्य खेळाडूंना पराभूत केले. याशिवाय श्रीलंकेचा रश्मिथा लियानगे, तसेच उत्कल साहू, हर्षित साहू, ऋत्विक मुम्मणा व्यंकट या भारतीय खेळाडूंविरुद्ध नोंदविलेले विजय उल्लेखनीय ठरले. भारतीय आयएम नीलाश साहा, रशियन आयएम डेव्हिड गोचेलाश्विली यांना त्याने बरोबरीत रोखले.

Ameya Audi Chess Goa
Vijay Merchant Trophy: गोव्याचा संघ 77 धावांत गारद! महाराष्ट्राच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजी कोसळली

स्पर्धेत विजेतेपद मिळविलेला व्हिएतनामचा न्गुयेन क्युओक हाय व उपविजेता बेलारुसचा ग्रँडमास्टर ॲलेक्सी फेडोरोव यांचे समान आठ गुण झाले. प्रत्येकी साडेसात गुण मिळविलेल्या ग्रँडमास्टर पी. ए. इनियान, ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती, आयएम साहिल डे, आयएम अमेय अवदी व आयएम एल. श्रीहरी यांना अनुक्रमे तिसरा ते सातवा क्रमांक मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com