Goa Aquatic Crown: ‘गोवा ॲक्वेटिक क्राऊन’ स्पर्धेत 500 जलतरणपटूंचा सहभाग, करंजाळे समुद्र किनारी आयोजन

Open Water Swimming Goa: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्‌सच्या सहकार्याने ओपन वॉटर स्विमिंग अकादमीने आयोजित केलेल्या ‘गोवा ॲक्वेटिक क्राउन २०२५’ च्या स्पर्धेला शनिवारी सुरवात झाली.
Swimming
SwimmingX
Published on
Updated on

पणजी: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्‌सच्या (एनआयएसडब्ल्यू) सहकार्याने ओपन वॉटर स्विमिंग अकादमीने आयोजित केलेल्या ‘गोवा ॲक्वेटिक क्राउन २०२५’ च्या स्पर्धेला शनिवारी सुरवात झाली. या स्पर्धेत विविध गटातील एकूण ५०० जलतरणपटूंनी भाग घेतला आहे.

स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्ष योगीराज कामत, सचिव सुदेश नागवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. शनिवारी सकाळच्या सत्रात दोन किलोमीटर आणि दहा किलोमीटर गटातील स्पर्धा झाली.

स्पर्धेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विजेत्या आणि उपविजेत्यांना खेळाडूंना पदक प्रदान केले. यावेळी ओपन वॉटर स्विमिंग अकादमीचे संस्थापक सुरजीत सिंग दाडीयाला व एनआयडब्ल्यूएसचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा करंजाळे येथील एनआयडब्ल्यूएसच्या समुद्रकिनाऱ्यावर झाली.

Swimming
Goa Sports: गोवा क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक ‘रडार’वर! काही केंद्रांवर शून्य प्रशिक्षणार्थी; अचानक तपासणीत खुलासा

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की गोवा हे येथील संस्कृती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यात बीचवरील अशा स्पर्धामुळे इतर खेळाडूंना त्यांच्या परिवारासह गोव्यात येण्याची संधी मिळते. येथील संस्कृती, खाद्यपदार्थ, इतिहास त्यांना जाणता येतो.

स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यात पर्यटनालाही चालना मिळते. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आंतराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. गोवा ॲक्वेटीक क्राउन ही केवळ शर्यत नसून ती खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अशी आठवण राहणार आहे.

Swimming
Goa Sports Organizations: राज्यातील क्रीडा संघटना आर्थिक संकटात; गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून मिळणारे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित

योगीराज कामत, गोवा जलतरण संघटना

‘‘गोवा ॲक्वेटिक क्राऊन ही समुद्रात पोहणाऱ्या खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. गोव्यात अशी स्पर्धा वारंवार आयोजित होणे गरजेचे आहे. कारण ओपन वॉटर स्पर्धा ही ऑलिंपिक पातळीवरील स्पर्धा असून अशा स्पर्धांतूनच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळू शकते. त्यामुळे आम्ही आयोजकांना शुभेच्छा देतो. गोवा जलतरण संघटनेने या स्पर्धेला आपला पाठिंबा जाहीर केला असून गोव्यातून अधिकाधिक खेळाडू सहभागी व्हावेत, अशी आमची आशा आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com