Gautam Gambhir: 'व्ह्यूज-लाइक्सची मला पर्वा नाही'; देशासाठी ट्रॉफी जिंकणे हेच माझे काम! गौतम गंभीरांचा निर्धार

Gautam Gambhir Latest Statement: देशासाठी ट्रॉफी जिंकत राहणे हे माझे काम आणि त्यावर माझा विश्वास आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
Gautam Gambhir Latest Statement
Gautam Gambhir Dainik Gomantak
Published on
Updated on

कोलंबो: बाहेरून कितीही टीका करण्यात येत असली तरी त्याचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर परिणाम होत नाही. देशासाठी ट्रॉफी जिंकत राहणे हे माझे काम आणि त्यावर माझा विश्वास आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

जुलै २०२४ मध्ये गंभीर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्रे स्वीकारली, त्यानंतर संघाला प्रामुख्याने कसोटी सामन्यांत अपयशाचा अधिक सामना करावा लागलेला आहे. मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातही मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. केवळ इंग्लंडमधील मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवता आली.

Gautam Gambhir Latest Statement
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

त्यामुळे होत असलेल्या टीकेबाबत विचारले असता गंभीर थेटपणे म्हणाले, ...टीका? मी त्याकडे लक्ष देत नाही, ट्रॉफी जिंकणे हे माझे काम आहे आणि मी त्याताच विचार करीत असतो. इतर प्रशिक्षक आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे, व्ह्यूज आणि लाइक्सची मी पर्वा करीत नाही.

श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत बोलताना गंभीर यांनी सांगितले, की कोलंबोला कसोटी सामना खेळायची वेळ येते तेव्हा पाच गोलंदाज संघात घेण्यावाचून मला पर्याय दिसत नाही. संघात पाच निव्वळ गोलंदाज घेऊन मोर्चेबांधणी करणे आवश्यक ठरते.

Gautam Gambhir Latest Statement
Goa Nightlife: बर्च अग्निकांडांत 25 जणांचा होरपळून मृत्यू; तरीही गोव्याची नाईट लाईफ बिनधास्त! धडा कधी शिकणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com