Bryson Fernandes: भारतीय फुटबॉलमध्ये गोव्याचा दबदबा! ब्रायसन फर्नांडिसची राष्ट्रीय संघात एंट्री!

Bryson Fernandes Selected For Indian National Football Team: एफसी गोवाकडून खेळणारा 23 वर्षीय मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस याची पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
Bryson Fernandes Selected For Indian National Football Team
Bryson FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa Midfielder Bryson Fernandes Selected For Indian National Football Team

पणजी: एफसी गोवाकडून खेळणारा 23 वर्षीय मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस याची पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. ब्रायसनच्या निवडीची बातमी येताच गोव्याच्या फुटबॉलविश्वात आनंदाची लहर पसरली.

गोव्याच्या ब्रायसन फर्नांडिसला प्रथमच संधी

एफसी गोवातर्फे (FC Goa) खेळणारा 23 वर्षीय गोमंतकीय मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस याची प्रथमच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. ब्रायसनने यंदा आयएसएलमध्ये अतिशय प्रभावी खेळ करताना 22 सामन्यांत सात गोल व दोन असिस्टची नोंद केली आहे. भारतीय संघाबरोबरच मानोलो मार्केझ एफसी गोवाचेही मुख्य प्रशिक्षक आहेत. आयएसएल स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे मार्केझ यांनी ब्रायसनने वारंवार कौतुक केले आहे. ‘सध्या त्याला (ब्रायसन) थोडी दुखापत आहे, त्यामुळे तो शनिवारी होणाऱ्या आयएसएल स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात मोहन बागानविरुद्ध खेळण्यासाठी कोलकत्यास जाणार नाही,’ अशी माहिती मार्केझ यांनी गुरुवारी (7 मार्च) पत्रकार परिषदेत दिली होती. पुरेशा विश्रांतीनंतर तो राष्ट्रीय संघासाठी उपलब्ध ठरण्याचे संकेत आहेत.

Bryson Fernandes Selected For Indian National Football Team
FC Goa: खेळ रटाळ, पण निकाल समाधानकारक! पंजाबवरील विजयानंतर FC Goaचे प्रशिक्षक मार्केझ असे का म्हणले? वाचा..

भारताचा फुटबॉल संघ

गोलरक्षक ः अमरिंदर सिंग, गुरमीत सिंग, विशाल कैथ, बचावपटू ः आशिष राय, बोरिस सिंग थांगजाम, चिंग्लेन्साना सिंग कोन्शाम, ह्मिंगथानवामिया, मेहताब सिंग, राहुल भेके, रोशन सिंग नाओरेम, संदेश झिंगन, सुभाशिष बोस, मध्यरक्षक ः आशिक कुरुनियान, आयुषदेव छेत्री, ब्रँडन फर्नांडिस, ब्रायसन फर्नांडिस, जीक्सन सिंग थौनाओजाम, लालेंगमाविया, लिस्टन कुलासो, महेश सिंग नाओरेम, सुरेश सिंग वांगजाम, आघाडीपटू ः सुनील छेत्री, फारुख चौधरी, इरफान यादवड, लाल्लियानझुआला छांगटे, मनवीर सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com