
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ३० जुलै २०२५ रोजी स्टेनने सोशल मीडियावर "पाचव्या कसोटीत सिराज पाच बळी घेईल" असा दावा केला होता, आणि नंतर भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने अगदी तशीच कामगिरी करत भारताला मालिकेत २-२ अशी बरोबरी मिळवून दिली.
द ओव्हल मैदानावरील या सामन्यात सिराजने पहिल्या डावातच आक्रमक सुरुवात करत जो रूट, ओली पोप, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांना बाद केले आणि चार बळी घेतले. भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमानांनी जोरदार प्रतिकार केला, पण अखेर त्यांना ३६७ धावांवर गुंडाळण्यात आले. ही केवळ ६ धावांनी मिळवलेली विजय भारताच्या कसोटी इतिहासातील धावांच्या दृष्टीने सर्वात कमी फरकाने मिळालेली सर्वात थरारक आणि संस्मरणीय विजये ठरली.
सिराजने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर झॅक क्रॉलीला बाद करत झंझावाताची सुरुवात केली. पुढे तात्पुरत्या कर्णधारालाही बाद करत त्याने इंग्लंडला धक्का दिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची आणि भारताला केवळ ४ बळींची गरज असताना तणावाचे वातावरण होते.
जेमी ओव्हरटनने चौकार मारत इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या, पण सिराजने जेमी स्मिथ आणि ओव्हरटनला बाद करत भारताचा विजय सुकर केला. अॅटकिन्सनने एक षटकार मारून सामना पुन्हा रंगतदार केला. क्रिस वोक्स दुखापतग्रस्त हात बांधून मैदानात उतरला आणि फक्त ७ धावांची गरज असताना सिराजने अचूक यॉर्कर टाकत अॅटकिन्सनचा स्टंप उडवला आणि भारतासाठी ऐतिहासिक विजय निश्चित केला.
या सामन्यात एकूण ९ बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत सर्वाधिक २३ बळी घेत ‘मालिकेचा गोलंदाज’ ठरण्याचा मान मिळवला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने जबाबदारी पेलत भारताला मालिकेत बरोबरी मिळवून दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.