I League: गुटिएरेझची शानदार हॅटट्रिक! पिछाडीवरुन मुंसडी मारत चर्चिल ब्रदर्सने नोंदवला विजय; शिलाँग लाजाँग पराभूत

Churchill Brothers Beat Shillong Lajong: चर्चिल ब्रदर्सने पूर्वार्धातील पिछाडीवरून भव्य मुसंडी घेत ६-१ असा दणदणीत विजय नोंदविला. यजमान संघाने आता ३४ गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे.
I League
Churchill Brothers Beat Shillong LajongDainik Gomantak
Published on
Updated on

Churchill Brothers Dominate Shillong Lajong 6-1 After Three Red Cards in I-League Clash

पणजी: आय-लीग फुटबॉल सामन्याच्या उत्तरार्धात शिलाँग लाजाँग एफसीच्या तिघा खेळाडूंना रेड कार्ड मिळाल्यामुळे त्यांना आठ खेळाडूंसह खेळावे लागले, त्याचा लाभ उठवत चर्चिल ब्रदर्सने पूर्वार्धातील पिछाडीवरून भव्य मुसंडी घेत ६-१ असा दणदणीत विजय नोंदविला. राय पंचायत मैदानावर झालेल्या या लढतीत विजयी संघाच्या कोलंबियन सेबॅस्टियन गुटिएरेझ याने हॅटट्रिक साधली. यजमान संघाने आता ३४ गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे.

सामन्याच्या २७व्या मिनिटास मार्कोस रुडवेरे याने पेनल्टी फटक्यावर केलेल्या गोलमुळे शिलाँग लाजाँगने आघाडी प्राप्त केली. ४९व्या मिनिटास त्यांच्या केनस्टार खारशाँग याला दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्ड मिळाले, त्यामुळे शिलाँग लाजाँगचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर ५०व्या मिनिटास पापे गास्सामा याने चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली. नंतर ५४व्या मिनिटास पाहुण्या संघाचा आणखी एक खेळाडू कमी झाला व त्यांना नऊ खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या रेनान पॉलिनो याला रेड कार्ड मिळाले.

गुटिएरेझ याने अनुक्रमे ५२, ६६ व ७८व्या मिनिटास केलेले गोल, तसेच शिलाँगमधील संघाच्या रणित सरकार याने ७३व्या मिनिटास केलेला स्वयंगोल यामुळे चर्चिल ब्रदर्सपाशी ५-१ अशा भक्कम आघाडी जमा झाली. ९०+२ व्या मिनिटास शिलाँग लाजाँगच्या रुडवेरे याला रेड कार्ड मिळाले. ९०+३ व्या मिनिटास वेड लेके याने पेनल्टी फटका अचूक मारून चर्चिल ब्रदर्सच्या टेनिस स्कोअर विजयावर शिक्कामोर्तब केले.

I League
I League: धेंपो क्लबला पराभवाचा धक्का! तळाच्या दिल्ली एफसीने नोंदवला तिसरा विजय

चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) व इंटर काशी या संघांचे प्रत्येकी १८ सामन्यांनंतर समान ३४ गुण झाले आहेत. एकमेकांविरुद्धच्या लढतीत गोव्यातील संघ सरस असल्याने त्यांना पहिला क्रमांक, तर काशी संघाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. शिलाँग लाजाँग संघाचे २६ गुण व पाचवा क्रमांक कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com