C K Nayudu Trophy: निराशाजनक! फलंदाजांची हाराकिरी; सौराष्ट्रचा गोव्यावर डावाने विजय

C K Nayudu U 23 Trophy 2024 : गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने दुसऱ्या डावात अतिशय निराशाजनक फलंदाजी केली, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटात सौराष्ट्रकडून डाव व ९५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
C K Nayudu U 23 Trophy 2024 Goa Vs Saurashtra
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

C K Nayudu U 23 Trophy 2024 Goa Vs Saurashtra

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने दुसऱ्या डावात अतिशय निराशाजनक फलंदाजी केली, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटात सौराष्ट्रकडून डाव व ९५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

राजकोट येथील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी गोव्याचा दुसरा डाव सकाळच्या सत्रात तासाभरातच आटोपला. सौराष्ट्रच्या सम्मर गज्जर (५-२८) व चंद्रराज राठोड (५-२२) यांनी गोव्याला दुसऱ्या डावात १०० धावांतच गुंडाळले. कालच्याच धावसंख्येवर कर्णधार कौशल हट्टंगडी बाद झाल्यानंतर गोव्याच्या एकाही फलंदाजास यजमानांच्या प्रभावी गोलंदाजीला तोंड देणे जमले नाही.

गोव्याचा हा स्पर्धेतील चार सामन्यानंतरचा पहिला पराभव ठरला. सौराष्ट्रने दोन पराभव व एका अनिर्णित लढतीनंतर बोनस गुणासह पहिला विजय प्राप्त केला. सौराष्ट्रला सामन्यातून एकूण १४ गुण मिळाले. त्यांना फलंदाजीत तीन, गोलंदाजीत चार, विजयाचे सहा, तर एक बोनस गुण मिळाला. आता त्यांचे चार लढतीतून २७ गुण झाले आहेत.

गोव्याला फलंदाजीत दोन व गोलंदाजीत एक मिळून सामन्यातून तीन गुणांचीच कमाई करता आली. एकंदरीत त्यांचे आता २५ गुण झाले आहेत. गोव्याचा पुढील सामना १५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.

C K Nayudu U 23 Trophy 2024 Goa Vs Saurashtra
Goa Police: गोव्यात दोन पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ! भररस्त्यात राडा, फसवणूक अंगलट, प्रोबेशन काळातच नोकरी गमावली

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २७४.

सौराष्ट्र, पहिला डाव ः ४६९.

गोवा, दुसरा डाव (४ बाद ६८ वरून) ः ४०.४ षटकांत सर्वबाद १०० (कौशल हट्टंगडी २३, आर्यन नार्वेकर ६, लखमेश पावणे १३, दीप कसवणकर ०, सनिकेत पालकर ९, शदाब खान २, शिवम प्रताप सिंग नाबाद २, सम्मर गज्जर ११-२-२८-५, चंद्रराज राठोड १७.४-८-२२-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com