C K Nayudu Trophy: गोवा संघाची दुसऱ्या डावात घसरगुंडी! सौराष्ट्रच्या हेत्विकचे शानदार शतक

C K Nayudu U 23 Trophy 2024: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटात गोव्याचा संघ पराभवाच्या खाईत अडकला. सौराष्ट्रविरुद्ध १९५ धावांच्या पिछाडीनंतर त्यांची सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर रविवारी दुसऱ्या डावात ४ बाद ६८ अशी घसरगुंडी उडाली.
C K Nayudu Trophy 2024
Saurashtra VS GoaDainik Gomantak
Published on
Updated on

C K Nayudu Trophy 2024

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटात गोव्याचा संघ पराभवाच्या खाईत अडकला. सौराष्ट्रविरुद्ध १९५ धावांच्या पिछाडीनंतर त्यांची सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर रविवारी दुसऱ्या डावात ४ बाद ६८ अशी घसरगुंडी उडाली. ते अजून १२७ धावांनी मागे आहेत.

राजकोट येथील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू आहे. गोव्याने तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात तीन गडी फक्त दहा धावांत बाद झाले, त्यामुळे सौराष्ट्रचे पारडे खूपच जड झाले. गोव्याचा कर्णधार कौशल हट्टंगडी २३ धावांवर नाबाद असून आता त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. सलामीच्या अझान थोटा याने ३४ धावा केल्या, तो यष्टीचीत बाद झाल्यानंतर गोव्याने आणखी दोन विकेट फक्त एका धावेत गमावल्या.

C K Nayudu Trophy 2024
Cash For Job: लाखोंच्या देणग्या, महाप्रसाद, दागिने अर्पण; लोकांकडून उकळलेल्या रुपयांतून 'दीपश्री'चे कारनामे

त्यापूर्वी, दुसऱ्या दिवसअखेरच्या ३ बाद २८८ वरून सौराष्ट्रने पहिल्या डावात रविवारी ४६९ धावा केल्या. त्यांचा कर्णधार हेत्विक कोटक याने शानदार शतक झळकावले. त्याने २८१ चेंडूंतील खेळीत १२ चौकारांच्या मदतीने १२६ धावा केल्या. हेत्विकने अंश गोसाई याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली.अंश याने १५६ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ८२ धावा नोंदविल्या. भाग्यराजसिंह चुडासमा यानेही अर्धशतक करताना १२३ चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने ८८ धावांचे योगदान दिले. मात्र सौराष्ट्रचे अखेरचे पाच गडी ३१ धावांत बाद झाले, त्यामुळे त्यांची आघाडी १९५ धावांपुरतीच मर्यादित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com