Goa Chess: अभिमान! गोमंतकीय कन्येचा चेक प्रजासत्ताकमध्ये डंका! बुद्धिबळ स्पर्धेत जिंकले विजेतेपद

Bhakti Kulkarni chess goa: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर (आयएम) भक्ती कुलकर्णी हिने चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या ओलोमौक समर इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
Bhakti Kulkarni chess goa
Bhakti Kulkarni chess goaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर (आयएम) भक्ती कुलकर्णी हिने चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या ओलोमौक समर इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्तीने चेक प्रजासत्ताकातील स्पर्धेत शानदार खेळ केला. या स्पर्धेच्या खुल्या क गटात भक्तीने नऊ फेऱ्यांत सर्वाधिक सात गुणांची नोंद करताना सहा विजय व दोन बरोबरींची नोंद केली.

Bhakti Kulkarni chess goa
Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

लिथुआनियाचा कँडिडेट मास्टर डॅनिएल सेर याला उपविजेतेपद, तर फ्रान्सता एर्वन लेव्हर याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. त्यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले होते. या स्पर्धेत विविध देशांतील ८२ खेळाडूंचा सहभाग होता.

Bhakti Kulkarni chess goa
Chess World Cup 2025: '...अन् तो डिस्कोत मनसोक्त नाचला', 23 वर्षांनी गोव्यात बुद्धीबळ विश्वचषक; आयोजकांनी सांगितला इराणी खेळाडूचा 'तो' किस्सा

भक्तीचे वडील प्रदीप कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, की भक्तीची कामगिरी कुटुंबीयासह गोवाच्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेने भक्तीचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Avani Sawant Cricket Performance
India First Rock Check Dam Indus River
Goa Ranji Trophy
Tanisha Crasto Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com