Babu Gaonkar: ‘मॉडर्न पेंटाथलॉन’मुळे दृष्टी बदलली! ‘गोल्डन बॉय’ बाबूचे ऑलिंपिक पदक हेच लक्ष्य

National Sports Day 2024: मॉडर्न पेंटाथलॉन या खेळात धावणे, जलतरण, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लेझर रन शूटिंग अशा पाच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे
National Sports Day 2024: मॉडर्न पेंटाथलॉन या खेळात धावणे, जलतरण, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लेझर रन शूटिंग अशा पाच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे
Babu GaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

National Sports Day Special

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा आणि काठमांडूत आंतरराष्ट्रीय ‘मॉडर्न पेंटाथलॉन’ स्पर्धा गाजवणारा बाबू अर्जुन गावकर याने आता ऑलिंपिकचे ध्‍येय समोर ठेवले आहे. ऑलिंपिक पदक हेच माझे लक्ष्य असल्याचे त्याने ‘गोमन्तक’ला सांगितले.

राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पार्श्वभूमीवर या ‘गोल्डन बॉय’शी संवाद साधण्यात आला. तो म्हणाला, मॉडर्न पेंटाथलॉन या खेळात मी राज्याला पहिले सुवर्णपदक मिळवून देईन, याचा विचारही केला नव्हता. मात्र पूर्ण क्षमता वापरून कामगिरी केली आणि मला त्यात यश मिळाले. आज या खेळामुळेच मला ओळखले जाते. मॉडर्न पेंटाथलॉन या खेळातच मला आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव उज्ज्वल करावयाचे आहे.

गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटाथलॉन या खेळाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. त्यामुळे गोव्यासाठीही हा खेळ नवाच. यात धावणे, जलतरण, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लेझर रन शूटिंग अशा पाच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पाच खेळांमध्‍ये तरबेज असल्याशिवाय पदक मिळणे कठीण असते. त्यामुळे हा खेळ आव्हानात्मक असतो. अशा नव्या खेळात गोव्याला एक ‘गोल्डनबॉय’ मिळणे म्हणजे मोठे अभिमानास्पद आहे.

बाबूला लहानपणापासून धावण्याची सवय होती. विद्यालयात जाताना किंवा गावातून नेत्रावळी परिसरात जाण्यासाठी तो धावत जायचा. घरापासून सर्वसाधारण तीन-चार किलोमीटर अंतर तेही डोंगरमाथ्यावरून तो सहज गाठत होता. त्यामुळेच राज्यात आयोजित विविध मॅरेथॉन स्पर्धांत तो सहभाग घेऊ लागला. त्या स्पर्धाही त्याने गाजवल्या. अनेक पारितोषिके पटकाविली. त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. निवड चाचणीत तो यशस्वी झाला आणि गोव्याला या स्पर्धेत पदकही मिळवून दिले.

एका रात्रीत बाबू गावकर हा गोव्याचा स्टार खेळाडू बनला असे म्हटले जात असले तरी त्याची तयारी अनेक वर्षांपासून सुरू होती हे लक्षात घ्यायला हवे. पदक मिळवताच बाबूवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आमदार, खासदार, मंत्र्यांनी तसेच विविध संघटनांनी बाबू गावकर याचे कौतुक केले. बक्षिसांचा वर्षावही झाला. आता बाबू हा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे. या खेळात आपल्याला स्वत:ला अधिक सिद्ध करायचे आहे, असे तो सांगतो. त्याच्यातील जिद्द, कौशल्य आणि धडाडी त्याला नक्कीच मोठे यश मिळवून देईल, यात शंका नाही.

National Sports Day 2024: मॉडर्न पेंटाथलॉन या खेळात धावणे, जलतरण, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लेझर रन शूटिंग अशा पाच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे
Kathmandu Pentathlon: गोव्याच्या बाबू गावकरला आंतरराष्ट्रीय सुवर्ण; नेपाळमधील स्पर्धेत अव्वल

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या बाबू गावकर याला मंगळवारी क्रीडा खात्यातर्फे आयोजित विशेष समारंभात पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना बाबू सांगतो की, मी क्रीडा क्षेत्रात पदार्पण करेन, असे वाटले नव्हते. मात्र ‘मॉडर्न पेंटाथलॉन’ या खेळाने या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. या खेळामुळे मला राज्याला पदक मिळवून देता आले, त्यामुळे मी खूप समाधानी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com