Armando Sadiku FC Goa: एफसी गोवा अन् आर्मांदो सादिकू यांची वाट आता वेगळी! अल्बानियन आघाडीपटूची संघाला सोडचिठ्ठी

FC Goa Football Updates: यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या एफसी गोवासाठी सर्वाधिक दहा गोल केलेल्या आर्मांदो सादिकू याने सामंजस्य कराराने संघाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले.
FC Goa Football Updates
Armando SadikuDainik Gomantak
Published on
Updated on

Armando Sadikou Leaves FC Goa By Mutual Consent After ISL Semis

पणजी: यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या एफसी गोवासाठी सर्वाधिक दहा गोल केलेल्या आर्मांदो सादिकू याने सामंजस्य कराराने संघाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले. यासंबंधीची माहिती एफसी गोवाने सोमवारी (14 एप्रिल) सोशल मीडियाद्वारे दिली.

अल्बानियाचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू असलेला सादिकू २०२४-२५ मोसमाच्या सुरवातीस एफसी गोवा संघात दाखल झाला होता. त्यापूर्वी तो २०२३-२४ मोसमात आयएसएल शिल्ड जिंकलेल्या मोहन बागान सुपर जायंट्स संघात होता. एफसी गोवा आणि सादिकू यांनी वेगळे होण्याचे ठरविल्यामुळे ३३ वर्षीय खेळाडू आगामी सुपर कप फुटबॉल स्पर्धेत खेळणार नाही. या स्पर्धेत ओडिशातील भुवनेश्वर येथे एफसी गोवाचा राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना २१ एप्रिल रोजी गोकुळम केरळाविरुद्ध (Kerala) होणार आहे.

FC Goa Football Updates
ISL 2024-25: FC Goa चे स्वप्न पुन्हा एकदा भंगले! सुनील छेत्रीचे निर्णायक हेडिंग, सरस गोलसरासरीसह बंगळूर अंतिम फेरीत

धडाकेबाज सुरवातीनंतर कामगिरीत घसरण

एफसी गोवातर्फे (FC Goa) २०२४-२५ मोसमातील सुरवातीस भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून देताना सादिकू याने पाच सामन्यांत सहा गोल नोंदविले. नंतर आयएसएल स्पर्धेतील पहिल्या सलग सात सामन्यांत त्याने आठ गोल केले, मात्र नंतर कामगिरी घसरली व या अनुभवी आघाडीपटूस पुढील १७ सामन्यांत फक्त दोन गोलच करता आले. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात बंगळूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथे त्याने एफसी गोवातर्फे अखेरचा गोल केला. एकंदरीत यंदा आयएसएल स्पर्धेत त्याने २४ सामन्यात दहा गोल व दोन असिस्टची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com