अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गोवा फुटबॉल संघटनेला (जीएफए) सर्वोत्तम सदस्य संघटना पुरस्काराने गौरविले. नवी दिल्ली येथे शुक्रवारी रात्री झालेल्या शानदार सोहळ्यात जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी पुरस्कार स्वीकारला.
देशांतर्गत फुटबॉलमधील २०२३-२४ मोसमात सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल जीएफएला सन्मानित करण्यात आले. या कालावधीत गोव्यात सर्वाधिक स्पर्धांत यशस्वी आयोजन झाले. कायतान यांच्या अध्यक्षतेखाली जीएफएच्या नव्या कार्यकारिणीनी २०२२ साली सूत्रे स्वीकारली होती. दोन वर्षांतच संघटनेने राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला.
``जीएफए अध्यक्षपदाची मी सूत्रे हाती घेतल्यापासून माझ्या समितीने राज्यात फुटबॉलला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खूपच परिश्रम घेतले. आम्ही गतमोसमात १४१४ सामने खेळविले, यामध्ये १६ लीग स्पर्धा, तसेच ६७६७ खेळाडूंचाही सहभाग राहिला. देशांतर्गत फुटबॉलमधील हा विक्रम आहे. हा पुरस्कार मागील दोन वर्षांतील आमच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रशस्तिपत्रक आहे,`` असे कायतान फर्नांडिस यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.