पणजी: राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या आठव्या योगासन, आर्टिस्टिक, रिदमिक योग क्रीडा स्पर्धेत गोव्याने चमकदार यश मिळविताना दोन सुवर्ण, पाच रौप्य व सहा ब्राँझपदके जिंकली.
खेळाडूंना योग प्रशिक्षक दामोदर गोवेकर व अश्विनी चुरी यांचे मार्गदर्शन लाभले. गोवा योग संघटनेचे उपाध्यक्ष नवीन आचार्य, सचिव हेमा केणी व इतर सदस्यांनी खेळाडूंचे स्वागत केले.
गोव्याचे पदक विजेते खेळाडू ः आर्टिस्टिक पेअर (८ ते १८ वर्षे मुली) सुवर्णपदक - तुसू मन्ना व कात्यायणी होनावरकर, आर्टिस्टिक सोलो (८ ते १८ वर्षे मुलगे) रौप्यपदक - दिविज बैत, आर्टिस्टिक सोलो (८ ते १८ वर्षे) ब्राँझपदक – ओम गोवेकर, रिदमिक पेअर (८ ते १८ वर्षे मुलगे) रौप्यपदक – ओम गोवेकर व तेजस तांडेल, आर्टिस्टिक पेअर (८ ते १८ वर्षे) रौप्यपदक – दिविज बैत व यशवंत मदार, आर्टिस्टिक फ्री फ्लो (८ ते १८ वर्षे मुलगे व मुली) ब्राँझ – ओम गोवेकर, आराध्या नाईक, तुसू मन्ना, कात्यायणी होनावरकर, प्रियांका गोराई, कीर्ती इटागी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.