
Women's Day 2025 Rita Mascarenhas Women Bike Training Goa Success Story
वाळपई: ‘स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची गाडी स्वतः चालवा’ हे ब्रीद घेऊन सत्तरीतील रिटा मास्कारेन्हस गेली आठ वर्षे वाळपईतील ग्रामीण भागातील महिलांना दुचाकी प्रशिक्षण देत आहेत. केवळ एक छंद म्हणून सुरू केलेल्या या प्रवासाने आज अनेक महिलांना स्वावलंबी बनविले आहे.
रिटा यांना लहानपणापासूनच दुचाकीची आवड होती. केवळ पाचवीत असताना त्यांनी दुचाकी चालवायला शिकली आणि हळूहळू त्यांच्या या आवडीने नवीन दिशा घेतली. लग्नानंतरही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत, २०१६ मध्ये त्यांनी महिलांना दुचाकी शिकवण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या प्रशिक्षणामुळे शंभरहून अधिक महिला आत्मनिर्भर बनल्या आहेत.
रिटा या केवळ दुचाकी प्रशिक्षक नसून, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दुचाकी रेसमध्ये भाग घेत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही पटकावली आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
रिटा सांगतात की, ‘जेव्हा एखादी महिला माझ्याकडून दुचाकी शिकते आणि स्वतःची गाडी घेते, तेव्हा मला अभिमान वाटतो.’ रिटा यांच्या या प्रवासाने अनेक महिलांना नवी उंची गाठण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. प्रारंभी अनेकांनी त्यांच्या कार्याची खिल्ली उडवली, टीका केली; पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि धाडसावर विश्वास ठेवत या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. पती नोलास मास्कारेन्हस आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचल्याचे रिटा सांगतात. महिला दिनानिमित्त, या स्वयंपूर्णतेच्या प्रवासाला आणि रिटा मास्कारेन्हस यांच्या कर्तृत्वाला सलाम! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
स्वावलंबन: महिलांना वाहतुकीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.
सुरक्षितता व आत्मविश्वास: दुचाकी चालवता आल्यास महिला कोणत्याही ठिकाणी आत्मविश्वासाने जाऊ शकतात.
रोजगाराची संधी: दुचाकी शिकल्याने महिलांना रोजगार (Employment) व उद्योजकतेच्या नवीन संधी उपलब्ध होतात.
आपत्ती व्यवस्थापन: तातडीच्या प्रसंगी महिलांना कोणाच्याही मदतीशिवाय प्रवास करता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.