Women's Day 2025: 'माझा सन्मान, माझी ओळख', महिला दिन विशेष

Women's Struggles: महिला दिनानिमित्ताने आमंत्रण आले; मी नकार दिला. हे भूषणावह नाही हे मला माहीत आहे. कुणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. असतात माझी माझी मते.
Women's Struggles
Women's Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Why I Refused Womens Day Honor And My Perspective On Equality

प्रा. नीना नाईक

महिला दिनानिमित्ताने आमंत्रण आले; मी नकार दिला. हे भूषणावह नाही हे मला माहीत आहे. कुणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. असतात माझी माझी मते. सत्कार ही ओळख आहे, ती कामाची पावती आहे. तिचे जीव तोडून कार्य हा तिचा सन्मान. तिचे २००% मिळावे. तिचा संघर्ष तिला मिळावा, पण महिला दिनाचे औचित्य साधून नाही.

ती प्रेरणा सर्वांची ३६५ दिवस असते. नेमकी महिला दिनी तिला शक्तिमान, ममता, त्यागाचे प्रतीक दाखवून, ‘यत्र नार्यस्तु पूज्जन्ते, रमंते तत्र देवता:’ का म्हणावे. मोठी भाषणे देणारे समस्त घरी महिलांना समान अधिकार देत असतील की उठल्या उठल्या वाफाळलेला चहा, जेवणात काय हे विचारत असतील. अशा स्त्रिया त्यांचे प्रेरणास्थान, योगदान असतील, अशी माझी शंका.

Women's Struggles
Women's Day 2025: स्त्री आरोग्य हा केवळ तिचा हक्क नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी

गंमत आणि असते स्त्रीचा त्याग, संघर्ष नेमका याच दिवशी दिसतो. महिला हसत हसत दुःख लपवत नाती टिकावी यासाठी ही विशेषणे स्वीकारते. डीपी, स्टेटसवरचे आई, बहीण, बेटीची किंमत आणि सलामी भारी दिसते उठून. काही तर सोबत काही ओळी लिहितात.

तू माझे प्रेम तुझ्याशिवाय दुनिया अधुरी आहे.

तू माझे घर स्वर्ग केलंस ईश्वर कृपेने आपण एकत्र आलो

माझी सफलता तू माझ्या पतंगाचा मांजा तू आहेस.

मी खोडकरपणे त्याला लिहिले भाई मांजा कापला तर काय?

हा शब्दांचा धो धो पाऊस नेमका महिला दिनी पडतो. सन्मान ओता पण वर्षभर. दबाव, गळचेपी करत राहा जेव्हा ती जग बदलायचा प्रयत्न करते. घरदार सांभाळणारी ती काही मागत नाही मागते ते बरोबरीचा दर्जा, स्वतंत्र विचार. ती विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे उल्लेखनीय कार्याचे कौतुक पात्र आहे. ती मागते लिंग समानता, पुनरुत्पादनाचा हक्क, अत्याचाराला विरोध, हिंसा, सुरक्षितता.

Women's Struggles
Women's Day 2025: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीजांशी संघर्ष करणारी 'रणरागिणी', सुधाताई जोशी यांची प्रेरणादायी कथा

यासाठी ती सरसावली तर पायाला धरून खेचणारा, समाजाचे भय, इज्जतीचा बागुलबुवा करणारा पुरुष असतो. स्त्रिया संघटित होतात हे पहिले की मोडता घालणारा पुरुष असतो. राजकीय क्षेत्रात सर्रास चित्र दिसते. शेवटी त्या निवडणुकीपुरत्या संघटित उरतात. महिला दिनानिमित्त कधीतरी अत्याचारी महिलांची, बलात्कारी महिला (Womens) यांचे पुढे काय झाले हे पाहायला जातात का महिला एकत्र येऊन पोलिस स्थानकात. पोलिस स्टेशनवर एक तक्ता असतो भले बोटभर असतील नावे रजिस्टर झालेली. करतो कधी शहानिशा? छे त्या भानगडी नको म्हणून सत्कार समितीत कैद्यासारखे बंदिस्त करून चौकटीत राहणे पसंत करतो. शेवट काय बदल घडवणार, तर बालवाडीत का बसा? ‘माझा सन्मान ही माझी ओळख’ म्हणत नवीन कार्याला शुभारंभ करेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com