Vagheri: हजारो फुलपाखरांचे आश्रयस्थान, वृक्षांनी समृद्ध 'वाघेरी डोंगर'

Vagheri Hill Goa: भूगर्भात असलेले मोठमोठे दगड वितळू लागले व दूरदूरवर पसरून पुन्हा थंड होऊन दगड बनले. मुसळधार पाऊस व वारा यासारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे त्याची झीज झाली.
Vagheri mountain
Vagheri mountainDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्याची भूमी ही एका बाजूने हिरव्यागार पर्वतरांगांनी समृद्ध असलेल्या सह्याद्री व दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राच्या कुशीत वसलेली असल्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य आजही खुलून दिसत आहे. गोमंतकाचा इतिहास आणि भूगोल घडविण्यात सह्याद्रीचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

येथील बारमाही वाहणाऱ्या नद्या, घनदाट वनराईमध्ये ठिकठिकाणी असलेले शीतल पाण्याचे झरे यामुळे गोव्याचे हिरवे वैभव सकस आणि समृद्ध आहे. गुजरातमधील तापी नदीच्या दक्षिणेपासून थेट कन्याकुमारीपर्यंत जी पर्वतांची रांग पसरलेली आहे त्याला पश्चिम घाट असे म्हटलेले आहे.

आज जी भूमी भारत म्हणून ओळखली जाते तेथे पश्चिम किनारा निर्माण झाल्यानंतर साडेसहा कोटी वर्षां भूगर्भात उद्भवलेल्या उद्रेकामुळे लाव्हारस उसळून वर आला आणि त्याचे एकावर एक थर पसरू लागले.

भूगर्भात असलेले मोठमोठे दगड वितळू लागले व दूरदूरवर पसरून पुन्हा थंड होऊन दगड बनले. मुसळधार पाऊस व वारा यासारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे त्याची झीज झाली. लाव्हारस थंड झाल्यावर त्यातून बसाल्ट शिलाखंडाचे रूपांतर अतिशय मजबूत थरामध्ये झाले.

गोव्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दख्खनचा काहीसा भाग पसरलेला आहे. परंतु गोव्याला लाभलेल्या पर्वतशृंखलांमुळेच सागरावरून वाहणाऱ्या मौसमी वाऱ्याला अडवले गेल्याकारणाने जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या कालखंडात येथे पावसाळा अनुभवायला मिळतो.

सह्याद्री पर्वत शिखरावरती पर्जन्यवृष्टी होत असल्याकारणाने गोव्यासाठी जीवनदायी ठरलेल्या मांडवी आणि जुवारीसह महत्त्वाच्या नद्यांचा उगम येथे होतो आणि त्यामुळेच ही भूमी पूर्वावार सुजलाम् सुफलाम्ता अनुभवत आलेली आहे.

गोव्यातल्या मांडवी, जुवारी, तळपण, गालजीबाग, तेरेखोल कोलवाळ या नद्या उंच पर्वतावरून उगम पावल्यावर खाली धाव घेतात आणि शेवटी अरबी सागराची विलीन होतात. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांशी ज्या सह्याद्रीतल्या प्रदेशाची सीमा भिडलेली आहे तेथे निसर्गाच्या विलोभनीय हिरवळीबरोबर तेथे स्थायिक असलेल्या जैवसंपदेचे दर्शन घडते.

गोव्यात प्रामुख्याने जांभ्या दगडांनी युक्त प्रदेशात लाल मातीचे प्रस्थ पाहायला मिळते. गोव्यातल्या सह्याद्रीशी संबंधित जी पूर्व शिखरे पाहायला मळतात, त्यामध्ये सोसोगड हा पर्वत गोव्यातील सर्वांत उंच असल्याची नोंद आहे. हे पर्वतशिखर सर्वोच्च असून, समुद्र सपाटीपासून त्याची उंची १०२७ मीटर इतकी आहे.

पदभ्रमण करून वाघेरीच्या माथ्यावरली पोह तेथे विस्तीर्ण दगडी पठाराचे दर्शन माध्यावरली पोहोचल्यावर जेथे आपली नजर पडेल तिथपर्यंत दगडांनी व्यापलेला परिसर दृष्टीस पडतो.

वाघेरी हा पर्वत सत्तरी तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. पूर्वी येथे उंच भागावर असलेल्या पठारावरती धनगर समाजाचे वास्तव्य होते. गोव्यातील घाटमाथ्यावर असलेल्या या जंगलाच्या मध्यंतरी असलेल्या भागात म्हशी पळायचे.

पावसाळ्यात व उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे गवत त्यांना सहज उपलब्ध व्हायचे. जंगलाच्या सांनिध्यात राहून त्यांनी आपल्या गरजा ओळखल्या होत्या. इतर जनावरांना काहीच त्रास न करता आपल्या उदार निर्वाहाबरोबर आपल्या म्हशीसाठी जे खाद्य आवश्यक असते त्यावर समाधान मानायचे. कालांतराने वन विभागाने अकासिया नामक विदेशी वृक्षाची लागवड केल्याने तेथे वास्तव्य करीत असलेल्या सजीव मात्रांचा अधिवासावर विपरीत परिणाम होऊ लागला.

वाघेरी डोंगर हा विशेषत पानगळतीच्या झाडांबरोबर काही प्रमाणात सदाहरित प्रजातीच्या वृक्षांनी समृद्ध आहे. हिवाळ्यात हे झाडे आपली पाने जमिनीवर टाकण्याअगोदर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान हजाराच्या संख्येने फुलपाखरे येथील एका एका झाडाला चिकटलेली दिसतात.

उन्हाळा असो किंवा पावसाळा वाघेरीच्या डोंगरावर जाताना अनेक सूक्ष्मजिवांपासून आपले रक्षण करावे लागते. उन्हाळ्यामध्ये गवत पूर्णपणे सुकून जाते त्याचबरोबर कारवी नामक झुडपेदेखील पूर्ण सुकून जातात.

त्यामुळे विशेषत: या या झुडपावर टिक नामक लहान जीव आपल्याला त्रासदायक ठरतात तर पावसाळ्यानंतर भरपूर रक्त पिणारे जळू संपूर्ण ठिकठिकाणी आढळतात. एकदा जळू पायाला चिकटली की रक्त पिऊन मोठी झाल्याशिवाय सोडणे काढून. हे घनदाट जंगलाचे वैशिष्ट्य आहे.

पूर्वी येथील उंचावरील पठारी भागात धनगर समाजाचे वास्तव्य होते. म्हशीसारख्या पशूंचे पालन पोषण करून त्यांनी आपला उदारनिर्वाह केला. जवळच डोंगराच्या उतारावरती असलेले मोरा कुच्याचे पाणी त्यांना जीवनाधार बनले होते. पेयजलची सुविधा व आपल्या म्हशींना भरपूर प्रमाणात गवत उपलब्ध असल्यामुळे त्यांनी येथेच स्थायिक होण्यास धन्यता मानली होती.

म्हशींना सामान्य गवताबरोबर काही उन्हाळ्यात विशिष्ट प्रजातीच्या गवताची गरज असते. वाघेरी डोंगरावरही गवत भरपूर प्रमाणात आढळत असल्यामुळे त्यांच्या गायी म्हशी ते खाऊन तृप्त व्हायच्या. आज वाघेरीच्या पायथ्याशी असलेल्या केरी गावातील काही लोक आपल्या गुरांसाठी गवत घाटमाथ्यावर असलेल्या कर्नाटकातील पारवड गावातून मागवतात यावरून पठारावर असलेल्या गावांमधील औषधी गुणधर्माबद्दल जाणीव होती.

डोंगराच्या उतारावरती पाणथळ जागा असल्यामुळे येथे बाराही महिने ऋतूनुसार विविध फुलपाखरे पाहायला मिळतात. हिवाळ्याच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान हजाराच्या संख्येने फुलपाखरे येथे येऊन आश्रय घेतात.

Vagheri mountain
Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

या फुलपाखरामध्ये ‘ब्ल्यू टायगर’ आणि ‘डार्क ब्लू टायगर’ या दोन फुलपाखरांच्या प्रजाती भरपूर संख्येने आढळतात. इतरत्र आपल्या जगण्यासाठी पोषक हवामान व खाद्य उपलब्ध नसल्याने ही फुलपाखरे वाघेरी पर्वतावर येऊन स्थायिक होतात. खुळखुळा नामक वनस्पतीची फुले आणि पाने त्यांना भरपूर आवडतात.

पिवळ्या रंगाने भरभरून सजलेली ही पुष्पवनस्पती पठाराला अधिक मनमोहक बनवतात. मान्सूनमध्ये पठारावर साचलेल्या डबक्याजवळ असलेल्या झाडांवर मलाबार ग्लायडिंग फ्रॉक अंडी लावतात. याच कालखंडात येथे आमरीच्या भरपूर प्रजाती आढळतात.

Vagheri mountain
Vaghurme: प्राचीन काळी गोव्यात भूकंप झाला, भुतखांब पठाराचा भाग कोसळून मांडवी पात्रात बेट निर्माण झाले; वाघुर्म्याचा ओहोळ

वाघेरीच्या एका टोकाला उभे राहून अंजुणे धरणाचे विहंगम दर्शन घेता येते. येथूनच वरच्या बाजूला जी देवराई आहे तेथे भरपूर प्रमाणात जंगली मसाल्याची झाडे आहेत. इतरत्र भागात लहान लहान झुडपे व मोकळा पठार आहे परंतु या देवराईतील झाडांची लांबी आणि जमिनीवरील मोकळी जागा पाहून वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्यासारखे वाटते. जेव्हा जंगलाला घनदाट वृक्षाच्छादन लाभते तेव्हा जमिनीवरील गवत भरपूर कमी प्रमाणात उगवून येते.

या वनराईला आजोबाची राय या नावाने संरक्षण देऊन येथील लोकमानसाने त्यांचे संवर्धन केलेले आहे. वाघेरी डोंगराबरोबर इतर भागातील परिसर पावसाळ्यातील पाणी आपल्या गर्भगृहात साठवत असल्यामुळे पायथ्याशी असलेल्या केरी गावातील आजोबांच्या तळ्याला बाराही महिने निर्मळ पाणी उपलब्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com