Gomantak Old Newspaper: 'जुने ते सोने'! 63 वर्षे उलटली, पण आठवणी ताज्याच! पांडुरंग फडते यांनी जपला 'गोमन्तक'चा ऐतिहासिक अंक

Gomantak newspaper February 1963: दोन-चार दिवसांपूर्वी एका ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकाने मला एक सुखद धक्का दिला. त्यांचे नाव पांडुरंग नानी फडते.
Gomantak newspaper February 1963
Gomantak Old NewspaperDainik Gomantak
Published on
Updated on

उमाकांत शेटये

दोन-चार दिवसांपूर्वी एका ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकाने मला एक सुखद धक्का दिला. त्यांचे नाव पांडुरंग नानी फडते. वय अंदाजे ८३-८४ वर्षे इतके आहे. पांडुरंग फडते बेतकीतील गांवकर वाड्यावर रहात होते. तिथून काही वर्षांपासून ते बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील न्यू गांवकर वाड्यावर आले असून तिथे राहतात. त्यांना वयोमानानुसार आरोग्याच्या कटकटी सतावत आहेतच. त्यांच्याकडे एक फार जुना, म्हणजे सोमवार, ४ फेब्रुवारी १९६३ चा जपून ठेवलेला दै. ‘गोमन्तक’चा अंक होता.

मी अधूनमधून वर्तमानपत्रांत लिहितो, हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच अगदी आस्थेवाईकपणे त्यांनी अगदी पार पिवळा झालेला, जीर्ण होण्याच्या वाटेवर असलेला तो गोमन्तकचा अंक त्यांनी माझ्याकडे सोपवला आणि त्याचबरोबर त्या अंकाशी निगडीत असलेल्या आणि त्यांनी अनुभवलेल्या, जगण्यात आलेल्या, त्यांनी हयातीत जोडलेल्या आठवणीही मला सांगितल्या.

Gomantak newspaper February 1963
Mallikarjun Kharge Rally In Goa: खर्गेंच्या सभेनं गोव्यातलं राजकीय वातावरण तापलं; विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मारणार मुसंडी?

सत्तर वर्षांपूर्वी आमच्या बेतकी गावात दै. ‘गोमन्तक’चे सात-आठ अंक धान्य सोसायटीत येत असत. त्याचबरोबर मडगावहून प्रसिद्ध होणाऱ्या विलिनीकरणविरोधी वर्तमानपत्राचा बहुतेक एकच अंक आमच्यासाठी येत असे. बाजारहाट किंवा इतर कामांसाठी माशेलला जाणाऱ्यांपैकी एखादा-दुसरा तेथून दैनिक ‘गोमन्तक’ चा अंक सोबत घेऊन येत असे.

मला हा अंक देणाऱ्या पांडुरंग फडते यांनी हा अंक पणजीहून आणला होता. त्या वेळी ते फक्त अठरा वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे दुर्धर आजाराने सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. आईची तब्येतही ढासळली होती. पायांना आणि तोंडाला सूज येत होती. माशेलमधील ‘बाबू वैज’ म्हणजेच डॉ. हरदत्त करंडे यांच्या औषधाने थोडाफार आराम मिळत असे.

अशातच, आज जिथे कला अकादमी आहे, त्या ठिकाणी एक आयुर्वेदिक वैद्य औषध देतो, असे कोणीतरी सुचविले. आईची माया होतीच; पण पैशांची चणचण अन् अडचणही होती. कशीबशी पैशांची तजवीज केली. आजारी माणसाला पणजीला घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते.

घाणो-सावईवेरे येथे ‘वाफोर’चा थांबा होता. बेतकीहून चालत जाऊन एकदाचा वाफोर पकडला. पणजीत येऊन वैद्याची भेट घेतली, औषधोपचार झाला; पण गुण पडला नाही.

Gomantak newspaper February 1963
Goa Politics: खर्गेंच्या दौऱ्यावरून गोव्यात ‘राजकीय घमासान! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली शाब्दिक चकमक

त्यावेळी आणलेला आणि नंतर इतकी वर्षे जीवापाड जपून ठेवलेला हा ‘गोमन्तक’च्या पहिल्या वर्षातील अंक. त्यात काय विशेष आहे, असेही कुणाला वाटू शकते. मला मात्र त्या अंकासोबत जोडलेल्या भावना जाणवल्या आणि म्हणून हे चार शब्द.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com