Dadu Mandrekar: 'गोव्याचा शापित सूर्य' दादू मांद्रेकर! पत्रकार, लेखक, छायाचित्रकार ते मानवी हक्कांचा लढवय्या; सहा वर्षांनंतरही स्मृतींचा प्रकाश कायम

Dadu Mandrekar Biography: काही माणसं अशी असतात की, ज्यांचे अस्तित्व कायम आपल्या सभोवतालच्या परिसरांत हवेसारखं वावरत असल्याचा भास होत असतो.
Dadu Mandrekar Biography
Dadu MandrekarDainik Gomantak
Published on
Updated on

सुरेश साबळे

काही माणसं अशी असतात की, ज्यांचे अस्तित्व कायम आपल्या सभोवतालच्या परिसरांत हवेसारखं वावरत असल्याचा भास होत असतो. कालांतराने त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात सूर्य वाटत फिरत असतात. अशा आठवणींची निर्मिती करणं सोपं नसतं. त्यासाठी कष्ट, श्रम आणि कामात सातत्य ठेवत मानापमानाची पर्वा न बाळगता संयमाने कृतीशील रहावे लागते, दादू मांद्रेकर हे नाव अशा कृतिशील व्यक्तिमत्वांपैकी एक होते.

दादू मांद्रेकर हा माणूस माणूसपणाच्या प्रतिष्ठापनेकरिता आयुष्यातला बहुतांश काळ पायाला भिंगरी बांधून संपूर्ण देशभरात भ्रमंती करत राहिला. ज्या ज्या ठिकाणी माणुसकीची निर्मिती तथा माणूसपणाची जपणूक, मानवी स्वाभिमानाचा सन्मान केला जातो, अशा जागांचा शोध घेत, तेथे जाऊन तेथील माणसं, त्यांचे आचार-विचार, त्यांचा आहारविहार, संस्कार आदींचे निरीक्षण करून त्यावर चिंतन, मनन करत त्यातून दादू मांद्रेकरांकडून साहित्य निर्मिती होत राहिली.

दादू यांनी मुक्त माणसांचे सुक्त गाणारी कथा, कविता, संशोधनपर लेखन करत बुद्ध- फुले- आंबेडकरी चळवळीस पुरक वैचारिक स्वरूपाचे विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय स्तंभ लेखन केले. बरेच ग्रंथ येऊ शकतील इतके त्यांचे हस्तलिखित साहित्य आजही त्यांच्या घरात पडून असून प्रकाशनाची वाट पाहत आहे. दादू मांद्रेकर यांचे आयुष्य दिवा होऊन सामाजिक व सांस्कृतिक प्रतिकूल परिस्थितीतही घोंगावत राहिले. दादू कायम सार्वजनिक आयुष्य जगले. ते स्वत:पुरतं सीमित आयुष्य जगू शकले असते, परंतु त्यांची स्वभाव प्रकृतीच सार्वजनिक आयुष्याची होती. समूहहित त्यांच्या जगण्याचं ध्येय होतं.

Dadu Mandrekar Biography
Goa Politics: पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस! 2 माजी नगरसेवक मैदानात; मिनीन डिक्रुझ आणि सुरेंद्र फुर्तादो यांचा तिकिटासाठी दावा

सूर्याचा उजेड गावभर पसरावा तसं दादू मांद्रेकरांचे जगणे संपूर्ण समाज व गावभर विस्तारलेले होते.त्यांनी आपल्या कामाची रोपं चौफेर अनेकांच्या मनात लावली आहेत. या रोपांची भविष्यात कामाच्या स्वरूपात छान डेरेदार झाडं व्हावीत, असे त्यांना मनोमन वाटे. त्यांच्या कामाचे स्वरूप बहुमुखी होते. एकाचवेळी ते पत्रकार, छायाचित्रकार, कवी, लेखक, विचारवंत, मानवी हक्कांची लढाई लढणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता होते. सर्कशीत सायकलचे विविध प्रयोग करणारा तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गंभीरतेने समाजचिंतन नोंदवणारा स्तंभलेखक त्यांच्या कामाच्या आठवणींचा सुगंध कायम दरवळत होता. संस्थात्मक पातळीवर दादू मांद्रेकरांनी केलेल्या कामाचा सुगंध यापुढेही दरवळतच राहील.

दादू मांद्रेकर यांची ग्रंथसंपदा शापित सूर्य, बहिष्कृत गोमंतक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर: आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि महात्म्य, सत्याचा शोध/(बुध्दाचे अनुवादित चरित्र), उंबरठा (कविता), ओंजळ लाव्हांची (कविता) याशिवायही अप्रकाशित अनेक लेख, कथा, ललित, वैचारिक, प्रवासवर्णन, पर्यावरण विषयक लेखनाचे हस्तलिखित त्यांच्या नावावर जमा आहे. त्याचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित होऊन सार्वजनिकरीत्या त्या साहित्यावर चर्चा होणे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ‘प्रजासत्ताक’ या वार्षिकांकाचे प्रकाशन ते करीत.

Dadu Mandrekar Biography
Goa Politics: गोव्यात राजकीय बदलासाठी नवी समीकरणं! सरदेसाईंची घोषणा; 'गोवा फर्स्ट' तिसरी नव्हे, पहिल्या क्रमांकाची आघाडी

भारतीय संविधान प्रेमी, लोकशाहीचा पुरस्कर्ता, मुलभूत मानवी हक्कांसाठीचा आग्रही लढवय्या दादू मांद्रेकरांच्या चळवळीचा गोतावळा संपूर्ण भारत देशात चौफेर असून परदेशांतही त्यांच्या फोटोग्राफी व व्यासंगी ज्ञानार्जनी भूमिकेचा चाहतावर्ग आहे. दादू मांद्रेकर यांचे कोणतेही काम राष्ट्रहित, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक समता व माणसातील माणूसपणाचा गोडवा वृध्दिंगत करण्यासाठीच राहिले. ते इतिहासात न रमता इतिहासाचा वर्तमानात अन्वयार्थ लावत मनुष्यांच्या उज्वल भविष्यसूचक विचारांची मांडणी करत. दादू मांद्रेकर हा संकटातही माणसांसाठी झटत राहणारा, संविधानप्रेमी २६ नोव्हेंबर २०२० रोजी अर्थात संविधानदिनीच अंतरला. दादू मांद्रेकर यांना जाऊन आता सहा वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com