Gulega worship in Tulu Nadu: ..वराह रूपं दैव वरिष्ठं! इतिहास तुळुनाडुतील ’कोला’ उत्सवाचा

Ancient spirit worship in India: प्राचीन पंथांची उत्क्रांती समजून घेतल्याने आपल्यामध्ये प्रचलित असलेल्या काही धार्मिक गूढता स्पष्ट करण्यासाठी काही संकेत मिळण्याचा ते प्रयत्न करत.
Ancient spirit worship in India
Gulega worship in Tulu NaduDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

मानव, त्यांच्या आदिम जीवनशैलीच्या नित्यक्रमात अनेक संकटांचा सामना करत असत. त्यांनी कठीण टप्प्यांवर मात करण्यासाठी त्यांच्या सभोवतालच्या अदृश्य अलौकिक घटकांचे आशीर्वाद आणि नैतिक समर्थन मिळविण्याच्या आवश्यकतेतून गूढ शक्तींची उपासना सुरू केली असावी.

त्या त्या क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या देवतांची उपासना ही जगातील सर्वात प्राचीन उपासनेपैकी एक. मानवी उत्क्रांतीच्या काळापासून, प्राचीन लोक असं मानत की संपूर्ण विश्व ईश्वराच्या दैवी शक्तींद्वारे नियंत्रित आहे. मानवाच्या विविध गटांनी आणि पंथांनी, वेळोवेळी, सर्वशक्तिमान देवाच्या संकल्पनेभोवती अनेक पंथ आणि विश्वासांचा शोध लावला.

उत्क्रांतीच्या इतिहासाच्याद्वारे आपण केवळ हिंदू धर्म, नाथ पंथ, बौद्ध आणि जैन धर्माच्या विविध पूर्ववैदिक, वैदिक आणि उत्तर-वैदिक अवस्थेचे नव्हे तर इस्लाम, यहुदी आणि ख्रिश्चन धर्म देखील पाहिले. उत्क्रांतीच्या इतिहासादरम्यान प्रत्येक गटाने त्यांच्या विशिष्ट श्रद्धा किंवा धर्माच्या अटी आणि नियमांचे पालन करण्यासाठी अधिकाधिक लोकांना गोळा करण्याचा प्रयत्न केला.

प्राचीन पंथांची उत्क्रांती समजून घेतल्याने आपल्यामध्ये प्रचलित असलेल्या काही धार्मिक गूढता स्पष्ट करण्यासाठी काही संकेत मिळण्याचा ते प्रयत्न करत. इतिहासाच्या पूर्वीच्या दिवसांत गूढ शक्तींच्या उपासनेचा पंथ जगभर अस्तित्वात होता जो वेगवेगळ्या स्वरूपात होता.

कालांतराने, इतर प्रतिस्पर्धी पंथ आणि संप्रदायांच्या आगमनामुळे गूढोपासनेचे पंथ नामशेष झाला असावा.

अनेक लेखकांनी क्षेत्रपाल, खेत्री, देवचार किंवा भुताराधनेच्या पंथासाठी ‘भूतपूजा’ ही संज्ञा वापरली आहे. तुळुनाडुतील स्थानिक लोकांमध्ये गूढ उपासना भूत-आराधना म्हणून ओळखली जाते. तुळु शब्द भूता ला संस्कृतमध्ये समतुल्य शब्द आहे ज्याचा अर्थ आहे भूतकाळ किंवा मृतांच्या आधिभौतिक अवशेष व आठवणी.

आराधना म्हणजे पूजा. भुताराधनेच्या बाबतीत पंथ किंवा त्या उपासनेमागे कोणतेही नकारात्मक हेतू किंवा काळी जादू नाही. भुताची उपासना करतात ते भुतांबद्दल अपार आदर, भावना आणि देवत्वाची भावना बाळगतात.

भारतात पण प्राचीन आफ्रिकन वंशाच्या पूर्वजांचे अवशेष अजूनही जतन केले गेले असल्याचे आपल्याला पाहावयास मिळतात, करावली करावरमध्ये काही जमाती केपरी नावाच्या भूत उपासना करतात. केप्री हा प्राचीन आफ्रिकन वंशाचा कीटक भूत देव म्हणून मानत.

अट्टावराजवळ कापरी-गुड्डा किंवा कापरीची टेकडी नावाचे एक प्राचीन ठिकाण जतन केलेले आहे जे असे सूचित करते की केपरी (किंवा कापरी) पूजेचे अवशेष पूर्वी अस्तित्वात होते, परंतु आता कालौघात ते नष्ट झाले आहे.

कर्नाटकात प्रदेशातील मंगळुरू शहराच्या आसपासच्या परिसरात गुलिगा देवाची पूजा झाडाच्या सावलीत ठेवलेल्या छोट्या आयताकृती दगडाच्या रूपात केली जाते. प्रतीकात्मक संरचनेचा साधेपणा गुलिगा पंथाची प्राचीनता सूचित करतो.

प्रतीकात्मक शिल्पकलेचे दैवी रूपे आणि लाकडी किंवा धातूचे मुखवटे येण्याआधी, सर्वात जुने आत्मिक रूप प्रतीकात्मक दगडांच्या रूपात पुजले जात होते. तुळुनाडुत ‘कोला’ या उत्सवात गुलिगा देव पात्राच्या स्वरूपात समावेश असतो ज्याचा चेहरा विचित्रपणे लाल, पांढरा आणि काळ्या रंगात रंगलेला असतो आणि कोमल ताडाच्या पानांचा पोशाख परिधान करून जळत्या लाकडांभोवती उत्कटतेने नाचतो.

गुलिगाची देवीच्या मंदिर परिसरात ‘क्षेत्रपाल’ म्हणून पूजा केली जाते. तो देवीच्या प्रवासात तिच्यासोबत फिरतो. त्याच्या पराक्रमासाठी त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

त्याची पूजा दगडाच्या रूपात केली जाते, विशेषत: त्याच्यासाठी असे मानले जाते की पवित्र जागा ऊन आणि पावसासाठी खुले असल्याने, तो अधिक ऊर्जा शोषून घेतो आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील अधिकाराच्या प्रदेशावर परिणाम करणारे वाईट आत्मे आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी अधिक सामर्थ्यवान बनतो.

तुळुनाडुत लोक मानतात की गुलिगा देव देवीच्या रोषाचा फटका सहन करून आपल्या भक्तांचे रक्षण करतो व ‘कोला’ समारंभांदरम्यान, तो काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांसह रंगविला जातो, ज्यामध्ये एक भयंकर अस्तित्व दर्शवले जाते.

Ancient spirit worship in India
Goa History: गोवा मुक्तीसाठी कुख्यात डाकू 'मानसिंह'ची धडपड! पोर्तुगीजांना हाकलण्यासाठी भारत सरकारला लिहिलं होतं पत्र, वाचा संपूर्ण कहाणी

तिथले लोक असं पण मानतात की बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त तो पितो आणि ते कच्चे खातो. म्हणून त्याला ‘अंबारा मार्ले’ (औपचारिक क्षेत्राभोवती उडी मारणारी आणि उंच उडी मारणारी आकृती) आणि ‘मासोगौ बायसुना संचारी दैवा’ किंवा जिवंत बळी देणारा प्राणी व भटकणारा दैवी आत्मा असे म्हणतात.

आख्यायिका म्हणते की तो एक शिवगण असल्याने, आदिशक्ती पार्वतीच्या सोबत पृथ्वीवर येतो. परशुराम क्षेत्राच्या निर्मळ सौंदर्याने आणि पवित्रतेने भारावून, ती तुलुनाडूमध्ये ‘लिंगा’च्या रूपात स्थायिक होते आणि तिला तिच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी गुलिगाला रक्षक म्हणून राहण्यास सांगते.

Ancient spirit worship in India
Mumai Mahim History: कळव्याला 2 फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले, भोज राजा प्राणास मुकला; इतिहास मुंबईच्या माहीमचा

‘जत्तीगा’ देव हा गुलिगाचा भाऊ म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातील कुंदापुरा आणि आजूबाजूच्या भागात जत्तीगाची पूजा गुलिगासारख्या प्रतीकात्मक दगडाच्या प्रमाणेच केली जाते. अंकोला आणि उत्तरा कन्नडच्या इतर भागांमध्ये जत्तीगा या नावाने ओळखला जातो. जत्तीगा हे शेतीच्या एका कोपऱ्यात कायमस्वरूपी ठेवलेल्या दगडाच्या रूपात दर्शविले जाते.

अंकोलातील शेतकरी वर्षातील एका खास दिवशी या दगडाची पूजा करतात आणि पिकांच्या चांगल्या उत्पादनाच्या रूपात जत्तीगाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात. जत्तीगा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागात शिलाहार राजवंशातील राजाचे नाव होते. या राजवंशात असे दोन जत्तीग होऊन गेले. इतिहासात पूर्वी या नावाचे अनेक योद्धे राजांसाठी युद्धात बलिदान देत असावे व अशा नायकांना वीरगळ उभारणीद्वारे अमर केले गेले आणि नंतर दैवी आत्मा म्हणून त्यांची पूजा केली गेली असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com