Coconut: गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीत महत्वाचे स्थान मिळवणारा, जीवनाचे झाड अर्थात माडावर येणारा बहुपयोगी 'नारळ'

Coconut Farming: नारळ हा ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पिकतो आणि ज्या देशांमध्ये त्याचे उत्पन्न होते तिथं तो स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे.
Coconut Day
coconut treeDainik Gomantak
Published on
Updated on

नारळ हा ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पिकतो आणि ज्या देशांमध्ये त्याचे उत्पन्न होते तिथं तो स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

नारळ ज्यावर पिकतात तो माड हे एक प्रकारे ‘जीवनाचे झाड’ आहे, जे लोकांना अन्न, पेय, निवारा आणि कौटुंबिक उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत मिळवून देते असे मानायला हरकत नाही. जगात जिथे जिथे नारळाचे उत्पादन होते, तिथल्या लोकांचा दिवस त्यांच्या स्वादिष्ट नाश्त्यात, मसालेदार कढीत किंवा मिष्ठांन्नांमध्ये नारळ नसला तर पूर्ण होणार नाही. 

एकूण जागतिक उत्पादनापैकी 96% उत्पादन अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून येते तथापि पारंपारिक नारळाच्या उत्पादनाच्या असलेल्या कमी किंमती आणि त्याची असलेली अस्थिर बाजारपेठ यामुळे हे शेतकरी नारळापासून केवळ किरकोळ उत्पन्न मिळवू शकतात. शेतीची घटत असलेली उत्पादकता, कीटक आणि रोग, पिकातील बदल आणि शहरीकरण यामुळे नारळाच्या उत्पादनाला सर्वत्र गंभीर धोका निर्माण झाला आहे. 

Coconut Day
Coconut Benefits: हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी सुके नारळ ठरते गुणकारी; जाणून घ्या नियमित खाण्याचे फायदे

जागतिक स्तरावर, इंटरनॅशनल कोकोनट जेनेटिक रिसोर्सेस नेटवर्क (COGENT) द्वारे, नारळ उद्योगाचा कणा असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्याच वेळी नारळाच्या संवर्धनात प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे विकसित केली जात आहेत. यातून नारळ आधारित उत्पन्न-तंत्रज्ञान विकसित करणे, त्याची चाचणी करणे आणि वेगवेगळ्या प्रकल्पाद्वारे अशा संसाधनांचे संवर्धन करणे आणि त्यातून शेतकऱ्यांचे दारिद्र्य कमी करणे अशी कामे हाती घेतली जात आहेत. 

Coconut Day
Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

नारळाचे उत्पन्न होणाऱ्या छोट्या जागेत आंतरपीक घेणे, तिथे पशुधनाची योजना करणे आणि त्यातून शेतीची उत्पादकता वाढवणे तसेच उच्च उत्पादन देणारी नारळाच्या जाती तयार करणे व त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य आहे. नारळापासून मिळणारे उत्पन्न हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक पारंपारिक भाग आहे आणि अनेक ग्रामीण समुदायांसाठी पोषणाचा एक प्रमुख स्त्रोत आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे. 

(कोकनट रेसिपीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड या डिजिटल पुस्तकाच्या प्रस्तावनेतून) 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com