Gaur: वाघालासुद्धा हताश करून पळवून लावणारा, गोव्याचा राज्यप्राणी 'गवा'

Goa State Animal: गवा हा तृणहारी प्राणी असला तरी त्याच्या शारीरिक बळाला कुणी आव्हान देण्याचे धाडस वाघाशिवाय दुसरा प्राणी शयतो करत नाही.
Bison in Goa, Gaur In Goa
Bison Sighting GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

म्हैस कुळातील धिप्पाड शरीर आणि प्रचंड ताकद लाभलेला गवा हा सर्वांत मोठा प्राणी आहे. गायी - म्हशी ज्याप्रमाणे आपला अधिकतम वेळ माळरानात उगवलेल्या गवतावर ताव मारून तेथे आराम करण्यात घालवतात त्याचप्रमाणे जंगल वाटेतून गवेसुद्धा चरण्यासाठी आपल्या कळपाबरोबर माळरानावर आलेले दृष्टीस पडतात. गवत व इतर पालापाचोळा खाऊन ते तृप्त होतात.

गवा हा म्हैस कुळातील प्राणी असल्यामुळे त्याचा एकंदर स्वभाव आणि गवत खाण्याची चाल म्हशीसारखी असते. अनेक वेळा गव्यांचा कळप खाली मान करून गवत खाण्यात दंग असतो, तेव्हा अचानक माणूस नजरेस पडल्यावर तेदेखील म्हशीसारखेच भांबावून जातात.

अल्पक्षणात पुढचे पाय उचलून मागे टाकून, पाठ फिरवून, आपल्या लहान पिल्लांना कळपाच्या मध्यभागी ठेवून पळ काढतात, तर कधी कधी काही सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर मागे वळून पाहतात आणि पुन्हा गवत खायला सुरुवात करतात.

गवा हा तृणहारी प्राणी असला तरी त्याच्या शारीरिक बळाला कुणी आव्हान देण्याचे धाडस वाघाशिवाय दुसरा प्राणी शयतो करत नाही. एखाद्या वाघालासुद्धा तो हताश करून पळवून लावतो. त्यामुळे वाघाला आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर लपून वार करावा लागतो.

विशेषत: वृद्ध किंवा आत्ताच जन्मलेल्या बछड्याच्या मानेवर चावा घेऊन वाघ त्याला ठार मारतो. पठारे, माळराने, कुरणे ही पावसाळ्यात गवताच्या हिरवळीने नटलेली निसर्गाने निर्माण केलेली नैसर्गिक परिसंस्था आहे.

वेगवेगळ्या प्रजातींच्या गवतातून तृणहारी श्वापदांना पौष्टिक आणि औषधी गुणांची प्राप्ती झाली नाही तर त्यांचे जगणे कठीण होते. आषाढ श्रावणापासून विविधरंगी फुलांनी बहरलेल्या या माळरानात ज्याप्रमाणे फुलपाखरे स्वच्छंदपणे विहार करतात त्याचप्रमाणे चितळ, मेरू, सांबर या सारख्या तृणहारी जंगली श्वापदांबरोबर सकाळ संध्याकाळी गवेही हमखास दृष्टीस पडतात.

हिवाळ्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यात मात्र त्यांना झुडपांच्या कोवळ्या पानावर ताव मारून आपली भूक भागवावी लागते. गवा हा एक शांत स्वभावाचा प्राणी आहे.

धोयाचे संकेत दिल्याशिवाय त्याचा आवाज कसा आहे हे कळणेदेखील कठीण होते इतका शांत. परंतु त्याचा बरोबर त्याचे लहान पिल्लू असेल तर आपण त्याच्यापासून अंतर ठेवण्यात धन्यता मानली पाहिजे. रागीट अवस्थेत तो आपल्याकडे पाहत हुंकार देऊन धोयाची सूचना देतो.

आपल्याला मुबलक प्रमाणात गवत कुठे उपलब्ध होईल याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे हा कुठल्याही दृष्टिकोनातून शिकारी प्राणी नसून चितळ, हरीण, गाय यांच्यासारखाच तो तृणहारी प्राणी आहे. भारतात आढळणाऱ्या गव्याला प्राणीशास्त्रामध्ये ‘बॉस गॉरस’ असे नाव आहे. गव्याचे नवीन जमलेले पिल्लू सोनेरी झाक असलेल्या पिवळ्या रंगाचे असते.

काही महिन्यानंतर ते तांबूस रंगात परिवर्तित होते. त्याला लगेच ओळखण्यासाठी त्याच्या शिंगाबरोबर त्याच्या गुडघ्यापर्यंत पांढरे असलेल्या पायांकडे लक्ष दिले जाते. महिष कुळातल्या अन्य प्राण्याच्या तुलनेत ही त्याची वेगळी ओळख करून देणारी खूण ठरते.

गवे जेव्हा कळपामध्ये असतात तेव्हा त्यातील मादी अतिशय सावध असते. धोयाची लक्षणे दिसताच ती संपूर्ण कल्पना घेऊन सुरक्षित जागेवर जाते. संपूर्ण कळपाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तिच्याकडे असते. अनेक वेळा प्रौढ असलेला नर माळरानावर किंवा जंगल मार्गाच्या बाजूला एकटाच चरत असताना दृष्टीस पडतो.

गोमंतकातील स्थानिक भाषेत गव्याला ‘गवा रेडा’ या नावाने ओळखले जाते. सत्तरीतील रेडेघाटी म्हणून नावारूपास आलेल्या मार्गालादेखील गव्या वरून नाव लाभल्याचे सांगितले जाते. आजही संध्याकाळच्या वेळी या मार्गाने प्रवास करताना रस्ता ओलांडताना त्यांचे दर्शन घडते.

गोव्यातील बऱ्याच ठिकाणी कन्नड भाषेचा प्रभाव काही प्रमाणात दिसून येतो. गोव्याच्या दक्षिणी टोकाकडे असलेल्या काणकोण या तालुयालासुद्धा पूर्वीच्या आडवाटेवरून ‘अडवट’ असे नाव प्राप्त झाल्याचे मानले जायचे.

कन्नड भाषेतूनच काणकोणला ‘काडकोण’ असे नाव प्राप्त झालेले असल्याचा संदर्भ कॅनरा जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळतो. काडकोण म्हणजे गवे. सत्तरी, काणकोण आणि फोंडा या तीन तालुयामधील गवाणे व गावणे या गावातील जंगल क्षेत्रात गाव्यांचा सुरक्षित नैसर्गिक अधिवास आहे.

जंगल वाटेने पदभ्रमण करत असताना ओलसर माती असलेल्या ठिकाणी लक्षवेधी ठरणारे त्यांच्या पायांचे ठसे त्यांचा अधिवास दर्शवितात. गावांना ही नावे गव्यांच्या अधिवासावरूल लाभली असावी.

सकाळी व संध्याकाळी ते चरण्यासाठी बाहेर पडतात आणि दुपारच्या वेळी विशेषत: झाडांच्या सावलीत एकांतस्थळी बसून ते आराम करतात. घाटमार्गत उगवणाऱ्या कारवी नामक झुडूपंची पाने ते मोठ्या आवडीने खातात.

त्याच्या शरीराला क्षाराची नितांत गरज असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या क्षारयुक्त असलेली जमीन चाटल्यावर त्यांना लोह, सोडियम, पोटॅशियम यांसारख्या तत्त्वांनी युक्त खनिजाबरोबर क्षाराची प्राप्ती होते. उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यावर ते खालच्या भागात येतात आणि येथील शेती बागायतीत उपलब्ध पिकांवरती ताव मारून शेतकऱ्यांचे नुकसान करतात.

गोवा सरकारने इथल्या पश्चिम घाटात आणि अन्यत्र वसलेल्या गवा हा गोव्याबरोबर पश्चिम घाटातील हिरव्यागार जंगलाची शान असून हा त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने त्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे.

जंगली सस्तन प्राण्यांमध्ये जबरदस्त शिंगांसाठी प्रसिद्ध असलेला गवा जवळपास प्रौढ बनल्यावर त्याचे वजन १ टनच्या आसपास होतो. त्याच्याकडील प्रचंड ताकद आणि बुद्धिमत्तेमुळे गोव्याच्या फोरसा गोवा या फुटबॉल संघाने आपले शुभंकर म्हणून गव्याचे मुख दर्शवले आहे.

Bison in Goa, Gaur In Goa
Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

गोव्यातील जंगलात जेव्हा जंगली बांबू उपलब्ध होते तेव्हा मान्सूनच्या काळात त्यांना आलेल्या कोंबाचा आस्वाद घेऊन गवे समाधान मानायचे. आज जंगलातील बांबूंचे प्रमाण कमी होत असून त्या जागी बागायती पिकांमध्ये विशेषतः काजूची लागवड केलेली आहे. त्यामुळे महाकाय देहाच्या गव्याला अन्नासाठी दूर दूर प्रवास करावा लागतो.

आज त्यांना काजूचे रसदार बोंडू खाण्याची चटक लागलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ते आपल्या काजू बागायतीमध्ये शिरतात आणि सहज उपलब्ध असणाऱ्या बोंडूवरती आवडीने ताव मारताना इतर लागवडीचीही नासधूस करतात. काजूसह अननसासारख्या रसदार फळांची चटक लागल्यावर गव्यांबरोबर इतर जंगली श्वापदांना रोखणे कठीण बनते.

Bison in Goa, Gaur In Goa
Bison In Ponda: बोणबाग- बेतोडामध्ये भरवस्तीत गवा रेड्यांचा मोकाट वावर, परिसरात भीतीचं वातावरण Watch Video

पूर्वी आपल्या गाईगुरांसाठी मुबलक प्रमाणात गवत उपलब्ध असलेल्या ठिकाणांना गायरान, गोठण, गौमोळ यांसारखी नावे देऊन त्यांचे संरक्षण केले होते. सह्याद्रीतल्या जंगलांनी आणि मौसमी गवताने समृद्ध पठारे या प्रदेशाची शान असल्याकारणाने इथे गव्यांचे प्राबल्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com